Saturday, June 20, 2026
Homeगडचिरोलीमागीलवर्षी झालेल्या नुकसानीचे अनुदान तातडीने देण्यात यावे-आमदार कृष्णा गजबे

मागीलवर्षी झालेल्या नुकसानीचे अनुदान तातडीने देण्यात यावे-आमदार कृष्णा गजबे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-मागीलवर्षी झालेल्या नुकसानीचे अनुदान अद्यापही शेतकरी वर्गाला मिळालेले नसल्याने अनुदान तातडीने देण्यात यावे; अशी मागणी आमदार कृष्णा गजबे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याकडे निवेदनातून केली आहे.गडचिरोली जिल्हा आदिवासी,दुर्गम,नक्षलग्रस्त व आकांक्षित जिल्हा असून,येथील नागरिक शेतीवर अवलंबून आहेत.पूर्व विदर्भाचा विचार करता जिल्ह्यात दरवर्षी अतिवृष्टी होते.यात जून-जुलै २०२३ मध्येही शेतकऱ्यांचे नुकसान झाले.त्याचे पंचनामे तयार करून नुकसान भरपाईचे प्रस्ताव शासनाकडे सादर करणे सुरू असतानाच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाची अतिवृष्टी झाली.यामुळे वैनगंगा व तीच्या उपनद्यांनी रौद्र रूप धारण केल्याने आरमोरी, वडसा तालुक्यासह जिल्ह्यातील नदीकाठावरील शेतातील हातात आलेल्या पिकाचे नुकसान झाले. त्याअनुषंगाने विभागीय आयुक्त,नागपूर यांनी २६ एप्रिल २०२४ ला नुकसान भरपाईचा अहवाल शासनाकडे सादर केला.त्यानुसार सदर नुकसानीचा निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे; अशी मागणी आमदार कृष्णा गजबे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मदत व पुनर्वसन मंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.विभागिय आयुक्त नागपूर यांनी जिल्ह्यातील एकूण ५ हजार ५५७ शेतकऱ्यांचे शेतपिकांचे नुकसान झाले असून,त्याकरिता ४ कोटी ५० लाख ४ हजार ६२५ रुपये नुकसान अनुदान प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.यात आरमोरी मतदार संघातील आरमोरी व वडसा तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांचा समावेश आहे.तत्पूर्वी जून, जुलै २०२३ मध्ये झालेल्या नुकसान भरपाई प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आमदार कृष्णा गजबे यांनी पाठपुरावा केल्यानंतर मदत व पुनर्वसन विभागाने शासन निर्णयानुसार महाडीबीटी पोर्टलवरून शेतकऱ्यांना मदतीचे वाटप सुरू आहे.परंतु, ऑगस्ट व सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या नुकसानीचा प्रस्ताव लोकसभा निवडणुकीमुळे बराच कालावधी लोटूनही शासनाकडे प्रलंबित राहिला,ही गंभीर बाब लक्षात येताच आमदार गजबे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. मात्र,अद्यापही यावर कार्यवाही झालेली नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!