Thursday, July 16, 2026
Homeगडचिरोलीमहिला मजुरांवर चिनगंगा नदीपात्रात काळाने घातली झडप…-गडचिरोली जिल्ह्याच्या गणपूर रै येथील मजुर

महिला मजुरांवर चिनगंगा नदीपात्रात काळाने घातली झडप…-गडचिरोली जिल्ह्याच्या गणपूर रै येथील मजुर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- चंद्रपूर जिल्ह्यातील नोंभूर्णा तालुक्यात मिरची तोडणीसाठी नावेने जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील गणपूर रै.येथील महिला मजुरांवर चिनगंगा नदीपात्रात काळाने झडप घातल्याची हृदयद्रावक घटना काल, दिनांक- २३ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली.दरम्यान दोन महिलांचे मृतदेह सापडले असून चार महिलांचा सायंकाळी उशिरापर्यंत थांगपत्ता लागलेला नव्हता.पुष्पा मुक्तेश्वर झाडे वय ४५ वर्षे, जिजाबाई दादाजी राऊत वय ५५ वर्षे,अशी मृत महिलांची नावे असून या घटनेने गणपूर रै.गावावर शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार,गणपूर रै.सह परिसरातील महिला तसेच पुरुष मजूर नेहमीच चंद्रपूर जिल्ह्यात मिरची तोडणीसाठी जात असतात.नेहमीप्रमाणे गणपूर येथील पुष्पा मुक्तेश्वर झाडे वय ४५ वर्षे,जिजाबाई दादाजी राऊत वय ५५ वर्षे, रेवंता हरीचद्र झाडे वय ४० वर्षे,सुषमा सचिन राऊत वय २४ वर्षे,नायाबाई अशोक राऊत वय ४५ वर्षे, बुधाबाई देवाजी दाऊत वय ५८ वर्षे व सारूबाई सुरेश कस्तुरे या सात महिला मिरची तोडणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील गंगापूर टोक या गावात नावेने जात होत्या.दरम्यान,नदीपात्राच्या मधोमध गेल्यानंतर पाण्याचा प्रवाह व वाऱ्यामुळे नाव नदीपात्रात उलटली.यात सातही महिला पाण्यात वाहून गेल्या.यावेळी नावाड्याने पोहून बाहेर निघत सारुबाई कस्तुरे या महिलेचे प्राण वाचवित नदीकाठ गाठले.मात्र इतर महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या.घटनेची माहिती प्राप्त होताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.चामोर्शी पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळ गाठित शोध मोहीम राबविली.यादरम्यान पुष्पा झाडे,जिजाबाई राऊत या दोन महिलांचे मृददेह आढळून आले.मात्र सायंकाळपर्यंत पथकाला उर्वरित चार महिलांचा थांगपत्ता लागला नाही.रात्र झाल्याने शोध मोहिमेत अडथळा येत असल्याने मोहिम थांबविण्यात आली.

आज बुधवारला सकाळी पुन्हा मोहीम राबविण्यात आली.घटनास्थळी राकाँचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार,गणपूर रै.चे सरपंच सुधाकर गद्दे, उपसरपंच जीवन भोयर माजी पंस सदस्य सुरेश परसोडे,राकेश बेलसरे, प्रमोद भगत, विनोद गौरकर, पोंभुर्णा पंस सभापती अलका आत्राम घटनास्थळी दाखल झाले होते.घटनेची माहिती प्राप्त होताच चामोर्शी आपत्ती व्यवस्थान पथकाने बोटीच्या सहाय्याने शोध मोहीम राबविली. दरम्यान मदतीकरिता प्राणहिता (अहेरी) आपत्ती व्यवस्थापन पथकालाही मोटार बोटीसह पाचारण करण्यात आले. दोन्ही पथकाद्वारे संयुक्तरित्या मोहीम राबविण्यात आली असता दोन महिलांचे मृतदेह आढळून आले. मात्र सायंकाळपर्यंत उर्वरित चार महिलांचा शोध लागला नाही.रात्र झाल्याने सदर मोहीम थांबविण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!