उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली : – महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांचा १६ फेब्रुवारी रोजीचा दौरा कार्यक्रम असून सायंकाळच्या सुमारास शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे मुक्काम होणार आहे.१७ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळच्या सुमारास गोंडवाना विद्यापीठ सभागृह येथे कुलगुरु गोंडवाना विद्यापीठ, उपकुलसचिव(आरक्षण कक्ष) गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली,विभागीय सहायक आयुक्त (मागासवर्ग कक्ष),नागपूर व सहसंचालक उच्च शिक्षण विभाग विभागीय कार्यालय गडचिरोली यांच्यासमवेत “अकृषी विद्यापीठ व अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील १ ऑक्टोंबर २०१७ अखेरच्या विद्यार्थी संख्या ग्राहय धरुन मंजूर शिक्षण पदभरतीचा आढावा” या विषयावर बैठक घेणार आहेत.