- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
अमरावती :-एका तरुण पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज,बुधवार २१ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास अमरावती शहरात उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.शहराच्या गाडगे नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले ३४ वर्षीय पोलीस कर्मचारी अमर तायडे यांनी त्यांच्या मार्डी रोड परिसरातील अंबिकानगर, तपोवन येथील राहत्या घरीच टोकाचे पाऊल उचलले. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली.अमर तायडे यांच्या आत्महत्याप्रकरणी कौटुंबिक वादाचे कारण असण्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.मात्र,घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.पोलिसांकडून सर्व संबंधित बाबींचा तपास केला जात असून तपासातून समोर येणाऱ्या माहितीच्या आधारे घटनेचे खरे वास्तव स्पष्ट होणार आहे. अमर तायडे यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूने अमरावती पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. अमर तायडे यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी आणि एक लहान मुलगी असा आप्त परिवार आहे.
- Advertisement -

