- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण १३ हजार ६०८ नोंदणीकृत मतदारांपैकी ९ हजार ९२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक आहे.
जिल्ह्यातील ९ हजार ३१० पुरुष मतदारांपैकी ७ हजार ३४ मतदारांनी मतदान केले असून,पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी ७५.५५ आहे.तसेच ४ हजार २९८ महिला मतदारांपैकी २ हजार ८९३ महिलांनी मतदान केले असून,महिलांच्या मतदानाची टक्केवारी ६७.३१ आहे.
नागपूर विभागात एकूण २ लाख ५५ हजार ६०३ मतदारांपैकी १ लाख ६५ हजार ५४१ मतदारांनी मतदान केले.नागपूर विभागाची एकूण मतदानाची सरासरी ६४.७६ टक्के असून,गडचिरोली जिल्ह्याचे मतदान या सरासरीपेक्षा ८.१९ टक्के-बिंदूंनी अधिक आहे.
विभागातील अन्य जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर येथे ७२.५९ टक्के,गोंदिया ७१.५३ टक्के,वर्धा ६८.३७ टक्के,भंडारा ६७.०७ टक्के आणि नागपूर येथे ६०.३३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
- Advertisement -

