Friday, June 26, 2026
Homeगडचिरोलीनवीन जातींना अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करतांना कायद्याचे काटेकोरपणे पालन व्हावे...- वनवासी...

नवीन जातींना अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करतांना कायद्याचे काटेकोरपणे पालन व्हावे…- वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने राष्ट्रपतींना निवेदन सादर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- नवीन जातींना अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करतांना कायद्याने विहित केलेले निकष आणि कार्यपद्धती काटेकोरपणे पाळली पाहिजे; असा प्रस्ताव अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाच्या उज्जैन येथे पार पडलेल्या बैठकीत पारित करण्यात आला.त्यानुसार आज १३ एप्रिल २०२३ रोजी वनवासी कल्याण आश्रम जिल्हा गडचिरोली तर्फे जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले.

केवळ विशिष्ट प्रथा किंवा भिन्न बोली भाषेमुळे अनुसूचित जमातीच्या यादीत कोणत्याही जातीचा किंवा गटाचा समावेश करू नये, तर लोकूर समितीच्या सर्व पाचही मापदंडांची पूर्तता करणे आवश्यक आहे.अन्यथा,ज्या उद्देशाने भारतीय राज्यघटनेत अनुसूचित जमातींची अनुसूची, अनुसूचित जाती,भटक्या जमाती आणि इतर मागास जाती यापेक्षा वेगळी बनविण्यात आली, त्याला काही अर्थ उरणार नाही, असेही केंद्रीय कार्यकारी मंडळाच्या ठरावात नमूद करण्यात आले. आदिम लक्षणांची चिन्हे, विशिष्ट संस्कृती, भौगोलिक वेगळेपण, व्यापक इतर समुदायांशी संपर्क साधण्यात संकोच आणि सामाजिक व आर्थिक मागासलेपण असे लोकुर समितीचे पाच निर्धारित मापदंड आहेत. मात्र, तात्कालिक राजकीय फायद्यामुळे आणि प्रबळ समाजाच्या दबावाखाली, अनेक विकसित, संपन्न अशा जातींना विहित निकषांना बगल देऊन अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट केले जात असल्याचे लक्षात येते.याकडे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाने लक्ष वेधले आहे.

नवीन जातींचा समावेश अनुसूचित जमातीच्या यादीत करताना, सर्व वैधानिक व कायदेशीर बाबींचे काटेकोर पालन व्हावे तसेच आदिवासी समाजाला, विशेषतः या समाजातील सामाजिक-राजकीय नेते, निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि युवकांनी याबाबत जागरूक राहून समाजात जनजागृती करावी, शासनावर दबाव निर्माण करावा आणि सर्व घटनात्मक मार्गांनी यास विरोध करावा, असे आवाहन अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाने आपल्या ठरावातून केले आहे.यामुळे अनुसूचित जमातीच्या घटनात्मक अधिकारांचेही रक्षण होणार असून,जनजाती भागातील संताप व अशांतता दूर होईल,असेही ठरावात नमूद करण्यात आले आहे.यावेळी जनजाती सुरक्षा मंच चे प्रांत मंत्री प्रकाश टी.गेडाम,गडचिरोली जिल्हा संघठन मंत्री अजय केदार,अहेरी जिला संघटन मंत्री राजु कोडागुर्ले,प्रसार प्रचार प्रमुख संतोष सुरपाम उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात केले स्वागत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "मोठी स्वप्ने पाहा,शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा," असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली...

डीआरआयची मोठी कारवाई; वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात बेकायदेशीर वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...

घरून निघाला ‘तो’ परतलाच नाही; ५९ वर्षीय इसम दहा दिवसांपासून बेपत्ता..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या श्रीनगर वार्डातील केस कटिंगचा (न्हावी)व्यवसाय करणारा ५९ वर्षीय इसम घरून दुकानात जाण्यासाठी निघाला तो अद्यापही घरी परतला नसल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!