Wednesday, May 13, 2026
Homeगडचिरोलीनऊ आरोग्य कर्मचाऱ्यांना 'फ्लोरेंस नाईटिंगेल' पुरस्कार..

नऊ आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘फ्लोरेंस नाईटिंगेल’ पुरस्कार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत वीर शहीद बाबुराव शेडमाके सभागृहात  ‘फ्लोरेंस नाईटिंगेल जिल्हास्तरीय पुरस्कार’ वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.या सोहळ्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नऊ परिचारिकांचा गौरव करण्यात आला.या कार्यक्रमास गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे(CEO),जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.प्रफुल्ल हुलके आणि जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ.पंकज हेमके प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन करतांना सुहास गाडे यांनी आरोग्य विभागाच्या बळकटीकरणात परिचारिकांचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले.
 तर डॉ. वर्षा लहाडे यांनी परिचारिका या आरोग्य व्यवस्थेचा खऱ्या अर्थाने कणा असल्याचे त्यांनी नमूद केले व डॉ.प्रताप शिंदे यांनी “तुम्ही जनतेच्या आरोग्याची काळजी घेता,त्यासोबतच स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे,” असे आवाहन त्यांनी सर्व परिचारिकांना केले.
  •  फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्कार विजेत्यांची यादी👇
कार्यक्रमात एकूण ९ आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या श्रेणीनुसार पुरस्कार प्रदान करण्यात आले:
  • १.आरोग्य सेविका श्रेणी👇
 प्रथम– अर्चना मुऱ्हारी मडावी (प्राथमिक आरोग्य केंद्र,पुराडा)
द्वितीय– रजनी कांचनलाल वासनिक(प्रा. आ. केंद्र, जिमलगट्टा)
तृतीय– वैशाली भिवाजी झाडे(प्रा.आ.केंद्र, जिमलगट्टा)
  • २.आरोग्य सहाय्यिका श्रेणी👇
प्रथम– शोभा अरूण गेडाम(प्रा.आ.केंद्र,मालेवाडा)
द्वितीय- छाया नरेश गजभिये(प्रा.आ.केंद्र,कोटगुल)
तृतीय– विद्या हनुमंतराव ऊईके(प्रा.आ.केंद्र,पुराडा)
  • ३.परिसेविका/अधिपरिचारिका श्रेणी👇
प्रथम– नजमा वाहीद बेग(ग्रा.रूग्णालय,भामरागड)
द्वितीय– नंदा मनोहर वालको(जिल्हा सा.रूग्णालय, गडचिरोली)
तृतीय– सुनंदा रमेश चांदेकर(उपजिल्हा रूग्णालय, अहेरी)
  • इतर विशेष सन्मान👇
फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्कारांव्यतिरिक्त,एकात्मिक रोग सर्वेक्षण(IDSP)कामात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य सेविका,सेवक आणि फार्मासिस्ट यांनाही अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच,मुंबई येथे झालेल्या DHPE प्रशिक्षणात जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या दोन आरोग्य सेविकांचा विशेष सत्कार करण्यात आला.यात स्मिता लोणारे व मीना राऊत यांचा समावेश आहे.
फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार हा भारतातील परिचारिका आणि नर्सिंग व्यावसायिकांसाठी दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे.हा पुरस्कार आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कार्य,समर्पण आणि निस्वार्थ सेवेची दखल घेऊन दिला जातो.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहशतवादविरोधी पथकाचे नागपूर,भंडारा,चंद्रपूरसह रज्याभरात छापे..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दहशतवादविरोधी पथकाने आज,बुधवार १३ मे रोजी सकाळपासूनच राज्यभरात धडक कारवाईचा सपाटा चालवला.पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टी याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी मुंबईसह...

गडचिरोली जिल्ह्यातील सात तालुक्यात होणार ४८ हजार लिटर केरोसीनचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून उद्भवणाऱ्या संभाव्य जोखमीचे निराकरण करण्यासाठी स्वयंप्रकाशासाठी व दिवाबत्तीसाठी सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत केरोसीनचे तालुकानिहाय वाटप करण्याचा निर्णय...

चक्क वाळू डेपोच्या सावंगी रेतीघाटात अवैध वाळू उपश्याचा खेळ..! – देसाईगंज महसूल अन् पोलीस विभाग निद्रावस्थेत; आम्ही सांगणार तेव्हाच डोळे उघडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात हल्ली रेती उपशाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.पुढील महिन्यापासून लिलाव झालेल्या सर्व रेती घाटांचा ताबा तहसील कार्यालयाकडे सोपविण्यात येणार...

उपराजधानीत मध्य भारतातील सर्वात उंच भगवान बजरंगबलीच्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मध्य भारतातील सर्वात उंच भगवान बजरंगबलीची(हनुमान)विराट आणि भव्य-दिव्य अशी मूर्ती तयार करण्यात येत असून नागपूरच्या कोराडी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!