Saturday, April 18, 2026
Homeगडचिरोलीदुचाकीचा वेग कमी करण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने अपघात.. -पती जागीच ठार तर...

दुचाकीचा वेग कमी करण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने अपघात.. -पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी; दुपारची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोलीचामोर्शी मार्गावरील दर्शनी चक गावा नजीक दुचाकीचा वेग कमी करण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन,यात मोरेश्वर दादाजी सातपुते वय ६० वर्षे रा.चामोर्शी, जि.गडचिरोली हे जागीच ठार झाले तर पत्नी सुमन मोरेश्वर सातपुते वय ५५ वर्षे ह्या गंभीर जखमी झाल्याची घटना आज,बुधवार २३ एप्रिलला दुपारच्या सुमारास घडली.
माहितीनुसार,मोरेश्वर सातपुते हे धानोरा तालुक्यातील
केरोडा येथे दुचाकीने पत्नीला आणण्यासाठी गेले होते.पत्नीला घेऊन येत असतांना गडचिरोलीचामोर्शी मार्गावरील दर्शनी चक गावा नजीक दुचाकीचा वेग पाणी पिण्यासाठी कमी करीत असतांनाच मोरेश्वर सातपुते यांचा दुचाकीवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी रोलिंगला दुचाकी धडकली.दुचाकी रोलिंगला धडकताच मोरेश्वर सातपुते रोलिंगलाच लटकून राहिले.त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पत्नी खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाल्या.सदरची घटना नागरिकांच्या निदर्शनास येताच गडचिरोली पोलिसांना पाचारण करण्यात आले.पोलिसांनी मृतदेह तसेच जखमी महिलेस तात्काळ गडचिरोली सामान्य रुग्णालयात दाखल केले.घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलिस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!