Friday, October 9, 2026
Homeगडचिरोली‘दिशा अभियान’अंतर्गत विशेष शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव..

‘दिशा अभियान’अंतर्गत विशेष शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन सुलभ व्हावे आणि समाजात त्यांचा वावर सहज व सन्मानपूर्वक व्हावा,यासाठी विशेष शिक्षकांनी संवेदनशीलतेने कार्य करावे.या विद्यार्थ्यांना स्वावलंबी व सक्षम बनविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत,असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले.
शासन स्तरावर बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी विशेष अभ्यासक्रम राबविणाऱ्या ‘दिशा अभियाना’मार्फत निवड करण्यात आलेल्या विशेष शिक्षकांचा आज शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात सत्कार करण्यात आला.यावेळी गाडे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.या शिक्षकांना दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे आयुक्त व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सहाय्यक आयुक्त चेतन हिवंज यांनी दिशा अभियानाच्या कार्याचा आढावा घेतला.हे अभियान केवळ विभागाच्या शाळांपुरते मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढवावी.सर्व शाळांमधील बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांनाही या विशेष अभ्यासक्रमाचा लाभ मिळावा,अशी अपेक्षा त्यांनी अभियान राबविणाऱ्या ‘जय वकील फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर,मुंबई’ या संस्थेकडे व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संयोजन दिशा अभियानाचे समन्वयक अभय रोटे व निलेश तोरे यांनी केले.यावेळी बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळांमधील विशेष शिक्षक उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक स्थगित करण्यासाठी रिट याचिका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तब्बल ९८ हजार ७८२ मतदारांचे अर्ज प्रलंबित असतांना अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची घाई केली जात...

माता व बालकांचे पोषण सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ‘व्हील्स ग्लोबल फाउंडेशन’शी सामंजस्य करार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील माता,अर्भक आणि लहान बालकांचे पोषण सुधारण्यासाठी तसेच कुपोषण प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन आणि व्हील्स ग्लोबल फाउंडेशन इंडिया...

आज ‘या’ जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यात आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून १६ मिनिटाच्या दरम्यान ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के...

गडचिरोली जिल्ह्यात चारा वाहतूक व विक्रीवर बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी आणि भविष्यात संभाव्य चारा टंचाई निर्माण होऊ नये,यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यांत अथवा राज्याबाहेर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!