Thursday, June 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदहावी,बारावी परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत समाज माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती चुकीची... - परीक्षा...

दहावी,बारावी परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत समाज माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती चुकीची… – परीक्षा मंडळाच्या सचिव अनुराधा ओक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षांची सविस्तर वेळापत्रके महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीत; असे स्पष्टीकरण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिले आहे.या परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत समाज माध्यमांतून प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती चुकीची असून,ती ग्राह्य धरण्यात येऊ नये; असे आवाहनही त्यांनी केले आहे.
काही संकेतस्थळांवरून फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांची वेळापत्रके जाहीर करण्यात आल्याबाबतची बातमी समाज माध्यमांतून प्रसारित झाली आहे.याबाबत मंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.यानुसार समाज माध्यमांतून प्रसिद्ध करण्यात आलेली २०२५  फेब्रुवारी-मार्च च्या दहावी-बारावीच्या परीक्षांची
 वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीत.या परीक्षांची वेळापत्रके मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील, याची सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी नोंद घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे. संभ्रम निर्माण केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही म्हटले मंडळाने आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!