नाशिक :-जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात ठाणगावजवळील आडवाडी येथे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांची १ हेक्टर २२ आर जमीन डोंगराळ भागात आहे.सिन्नर तहसील कार्यालयाला अकृषक मालमत्ताधारकांकडून वर्षाकाठी एक कोटी ११ लाखांचा महसूल अपेक्षितआहे.त्यापैकी गेल्यावर्षीचा ६५ लाखांचा महसूल थकला आहे. मार्चअखेर वसुलीचे उद्दिष्ट असल्याने महसूल विभागाने नोटीस अस्त्र बाहेर काढले आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांनी सिन्नर तालुक्यातील २१,९७० रुपयांचा अकृषक कर थकविल्याप्रकरणी सिन्नरच्या तहसीलदारांनी त्यांना नोटीस बजावली आहे. सिन्नरचे तहसीलदार एकनाथ बंगाळे यांनी थकीत अकृषक कराचा भरणा करण्यासाठी १,२०० अकृषक मालमत्ताधारकांना नोटीस पाठविल्या आहेत. पाठविलेल्या नोटिसांमध्ये ऐश्वर्या राय यांचाही समावेश आहे.