उद्रेक न्युज वृत्त
नाशिक :- टोमॅटोचे बियाणे निकृष्ट दर्जाचे दिल्याने ऐन हंगामात टोमोटो फळ आले नाही.त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले.शेतकऱ्याने बियाणे कंपनी आणि वितरकासह कृषी अधिकाऱ्याच्या विरोधात ग्राहक न्यायमंचात तक्रार केली होती.न्यायालयाने बियाणे कंपनीला १ लाख २० हजार नुकसान भरपाई आणि वितरक दुकानदाराला १० हजार रुपये शारीरीक मानसिक त्रासापोटी देण्याचे आदेश दिले.
ग्राहक न्यायमंचाने दिलेल्याय निकालानुसार, बाळासाहेब वडजे रा.तळेगाव वणी ता.दिंडोरी यांनी क्लाॅज सिड्स प्रा.लि कंपनीचे टोमॅटो बियाणे जुन्नरे बदर्स ऍग्रो प्रा. लि. पिंपळगाव बसवंत यांच्याकडून १० ग्रॅम वजनाचे ३ पिकिटे यांच्याकडून ३३०० रुपयांना बियाने खरेदी केले होते.
बियाणे रोपे तयार करुन ६० आर क्षेत्रात लागवड केली होती.पिकांची सर्व आवश्यक ती काळजी घेतली योग्य निगा राखली मात्र टोमॅटो च्या झाडांमध्ये नर जातीचे झाडांची संख्या अधिक असल्याने फळांना कळी लागली नाही. याबाबात बियाने विक्रेता आणि कृषी अधिकारी पंचायत समिती यांना कळविण्यात आले. मात्र त्यांनी या तक्रारीकदे दुर्लक्ष केले. बियाने तक्रार निवारण समितीने क्षेत्रात पहाणी मध्ये योग्य किड नियोजन असल्याने प्रादूर्भाव झालेला नसून नर जातींच्या झाडांची संख्या अधिक असल्याचे निदर्शनास आले होते.यामुळे पिकाच्या उत्पादनात ८५ टक्के घट येण्याची शक्यता होती.त्यावेळी १५०० ते १७०० रुपये प्रिती कॅरेट उत्पन्न मिळाले असते.२५० बाजार भावाप्रमाणे किमान ४ लाख ७५ हजार रुपये उत्पन्न मिळाले असते.मात्र सदोष बियाणामुळे पिक नष्ट झाले. संबधीत कंपनी आणि वितरकांकडून नुकसान भरपाई मिळण्याकरीता ग्राहक न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
न्याय मंचाचे अध्यक्ष मिलिंग सोनवणे, सदस्य सतीन शिंपी, प्रेरणा काळुंखे यांनी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकूण घेत बियाने कंपनीने तक्रारदार शेतकरी यांना १ लाख २० हजार नुकसान भरपाई द्यावी बियाने विक्रेता दुकानदाराने शारीरीक मानसिक त्रासापोटी १० हजार रुपये द्यावे असे आदेश दिले.

