Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीचोप ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार...

चोप ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  चोप येथे पुरस्कार प्राप्तीत गावपातळीवर विविध उपक्रम राबविण्यात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सिंहाचा वाट असल्याने आज,गुरुवार २४ एप्रिलला पंचायत राज दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद गडचिरोली येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या हस्ते चोप ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन लाडे, ग्रामसेविका मेघना राऊत व उपसरपंच प्रकाश डोंगरवार यांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.चोप ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबवून सन २०२०-२१ मध्ये स्मार्ट ग्राम(सुंदरग्राम)स्पर्धेत तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला होता.तर सन २०२३-२४ मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावून जिल्ह्यात बहुमान मिळवला होता.त्यातच चोप ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी,स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, सामाजिक सलोखा तसेच इतर उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात मोलाची भूमिका बजावल्याने आज गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या  उपस्थितीत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा पार पडला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!