उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- महावीर विकलांग सेवा समिती जयपूर यांच्या सहयोगाने,जैन भवन पठानपुरा वार्ड,चंद्रपूर येथे श्री.शांतीनाथ सेवा मंडळ चंद्रपूर द्वारा २० मार्च ते २६ मार्च २०२३ पर्यंत सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत गडचिरोली जिल्हयातील दिव्यांगांना पोलिओ ग्रस्तांसाठी कॅलीपर,ज्यांचे पाय कापलेले असतील त्यांचे साठी जयपूरी पाय,बगल घोडी (बैसाखी),ट्रॉयसिकल व्हिल चेअर,कर्ण यंत्र इत्यादी दिव्यांगाचे साहित्य वाटप निशुल्क करण्यात येणार आहे.तरी जिल्ह्यातील दिव्यांगानी याचा अवश्य लाभ घ्यावा.रुग्णांनी आपल्या सोबत पासपोर्ट फोटो व BPL कार्ड सोबत आणावे,रुग्णांनी कर्ण यंत्रासाठी डॉक्टरांचे चेकप कार्ड सोबत आणावे असे श्री. शांतीनाथ सेवा मंडळ चंद्रपूर यांनी कळीवले आहे. क्रमांक ७५८८६६००२२, ९८२२२४७३३९ यावर संपर्क साधावा.तरी जिल्हयातील सर्व गरजु दिव्यांगाना या शिबीराचे लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी संजय मीणा,जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली,मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गडचिरोली,जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.गडचिरोली यांचे मार्फत आवाहन करण्यात येत आहे.