Monday, August 17, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हयात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू….

गडचिरोली जिल्हयात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-जिल्ह्यात दिनांक २ ते ११ ऑक्टोबर२०२३ या कालावधीत मस्कऱ्या गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे.तसेच काही राजकीय पक्ष,संघटना व इतर नागरिक हे धरणे,मोर्चे, आंदोलने,सभा,मिरवणूक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात ४ ते १८ ऑक्टोबर २०२३ पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ चे कलम ३७ (१)(३) लागु  करण्यात आलेले आहे. 

त्यामुळे सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध उपाय करणे आवश्यक आहे. या कालावधीत पुढील गोष्टींना मनाई केलेली आहे. शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे,दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, किंवा जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे. 

व्यक्तिच्या किंवा प्रेताच्या किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे, ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे,अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे,चिन्हे,फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 

उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी (जे शक्य असेल ते) यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणीही मिरवणूक काढू नये, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर उपरोक्त कालावधीत जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही.सदर आदेश ४ ऑक्टोबर रात्री १२.०१ वाजतापासून १८ ऑक्टोबर च्या २४ वाजेपर्यंत संपूर्ण गडचिरोली जिल्हयाच्या क्षेत्राकरीता लागु राहतील, असे जिल्हादंडाधिकारी,गडचिरोली  यांनी आदेशीत केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!