गडचिरोली :- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोली यांच्या वतीने १६ जानेवारी २०२३ रोजी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले असून राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह ११ जानेवारी ते १७ जानेवारी २०२३ पर्यंत विविध कार्यक्रम करुन राबविण्यात येत आहे.सदर वॉकेथॉन आय.टी.आय.चौक ते कोर्ट चौक वरुन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात सांगता करण्यात आली व सर्वांना रस्ता सुरक्षेपर शपथ देण्यात आली.
वॉकेथॉनप्रसंगी पोलीस विभाग,वाहतुक शाखा व गडचिरोली येथील सहा.पोलीस निरीक्षक पूनम गोरे संपूर्ण टिमसह उपस्थित होत्या.तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथील शिक्षक भास्कर मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली २०० प्रशिक्षणार्थी व शिक्षक उपस्थित होते.वॉकेथॉनमध्ये मोटार वाहन निरीक्षक वैष्णवी दिघावकर,सहा.मोटार वाहन निरीक्षक एच.डब्ल्यू.गावंडे,सहा.मोटार वाहन निरीक्षक के.एस.पारखी,सहा.मोटार वाहन निरीक्षक एच. सी.काळे,सहा.मोटार वाहन निरीक्षक जी.एच. खराबे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हर्षल बदखल यांनी केले.