Sunday, June 14, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीसह राज्यात नवीन १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता... -आज गडचिरोली येथील शासकीय...

गडचिरोलीसह राज्यात नवीन १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता… -आज गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज,बुधवार दिनांक-९ ऑक्टोंबरला गडचिरोलीसह राज्यातील एकूण १० वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखली आयोजित या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार सह इतर केंद्रीय मंत्री दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, खासदार नामदेवराव किरसान,वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अविनाश टेकाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके तसेच इतर लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलतांना सांगितले की,राज्यात सुरू होत असलेल्या नवीन १० वैद्यकीय महाविद्यालयामुळे महाराष्ट्रामध्ये ९०० वैद्यकीय प्रवेशक्षमता वाढून ती आता सुमारे ६ हजार होत आहे.ही वैद्यकीय महाविद्यालये स्थानिक व लगतच्या परिसरातील नागरिकांसाठी सेवा केंद्र बनतील.तसेच वैद्यकीय महाविद्यालयामुळे युवा वर्गासाठी वैद्यकीय शिक्षणाच्या नवीन संधीचे दरवाजे उघडले गेले असल्याचे ते म्हणाले.
शासनाने वैद्यकीय शिक्षण सुलभ केले आहे; असे सांगून पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील तरुणांसाठी नवीन संधींची दारे खुली झाल्याचे नमूद केले.गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील जास्तीत जास्त मुले डॉक्टर व्हावीत आणि त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत हे शासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.एकेकाळी अशा प्रकारच्या विशेष अभ्यासासाठी मातृभाषेतील पुस्तके उपलब्ध नसण्याचे मोठे आव्हान होते.सरकारने हा भेदभाव संपवला आणि महाराष्ट्रातील युवकांना  मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण घेता येईल,असे सांगितले.युवक मातृभाषेतून शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करतील असेही ते म्हणाले.ग्रामीण भागातील विद्यार्थीही वैद्यकीय शिक्षणात अग्रक्रमी राहतील,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नवीन १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचाही शुभारंभ👇
राज्यात नवीन १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता प्राप्त झाली आहे.यामध्ये गडचिरोलीसह,अमरावती,मुंबई,नाशिक,जालना, बुलडाणा,हिंगोली,वाशिम,भंडारा आणि अंबरनाथ (ठाणे)अशा वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अस्वलाच्या मृत्यूने वनविभागात खळबळ..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर परिसरात एका जखमी नर अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने वन...

अल्पवयीन मुलांची भाईगिरी; तलवारीने केक कापून हवेत फिरवली पिस्तूल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मित्राच्या वाढदिवसानिमित्त तलवारीसारख्या हत्याराने केक कापत हवेत पिस्तूल फिरवून तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच भाईगिरी दाखवणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना...

शेतकरी चिंतातुर; मृग नक्षत्रानेही मारली दडी..!

उद्रेक न्युज वृत्त :-पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा एकीकडे हवामानाच्या अनिश्चिततेशी, तर दुसरीकडे वाढत्या उत्पादन खर्चाशी सामना करत आहे.मृग नक्षत्राचा जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही दमदार...

​देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात परिचारिकेच्या प्रसंगावधनाने वाचले प्रसूतीपश्चात मातेचे प्राण..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात एका प्रसूतीपश्चात मातेला हृदयविकाराचा झटका(Cardiac Arrest)आला असता कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत आणि तत्परतेने सीपीआर(CPR)देऊन मातेचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!