उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली) :- यावर्षी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर देसाईगंज तालुक्यातील कोकडी गावामध्ये दमा औषधाचे वाटप करण्यात येणार नसल्याचे वैद्यराज प्रल्हाद कावळे यांच्या कुटुंबियांकडून कळविण्यात आले आहे.अशातच आता कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा देवस्थान येथे दिनांक-८ जून ते ९ जून रोजी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर विनामूल्य दमा व इतर औषधाचे वाटप करण्यात येणार आहे.
औषधाचे वाटप मालेवाडा गावापासून पूर्वेस १० किलोमिटर अंतरावर असलेल्या खोब्रामेंढा देवस्थान याठिकाणी शनिवार,दिनांक-८ जून रोजी सकाळी ५ वाजेपासून ते रविवार,दिनांक-९ जून रोजी सकाळी ५ वाजे पर्यंत राहणार आहे.सदर औषधांमध्ये दमा,मिरगी,मूत्र खडा,कॅन्सर इत्यादी औषधांचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील तसेच जिल्हा बाहेरील व्यक्तींनी लाभ घेण्याचे आवाहन परिचकार भक्त दास नरुले महाराज खोब्रामेढा देवस्थान यांनी केले आहे.तसेच कोणत्याही प्रकारचा सर्पदंश झाल्यास सर्पदंश झालेल्या व्यक्तीचे नाव त्वरित खालील दिलेल्या मोबाईल नंबरवर कळविण्यात यावे. (मो.क्र.७५८८३६४९८७,९४०५८१५४७)
(7588364987, 9405815467)

