Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीकांग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान २७ मार्च ला नामांकन अर्ज करणार दाखल….

कांग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान २७ मार्च ला नामांकन अर्ज करणार दाखल….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

संपादक/ मुनिश्वर बोरकर 

गडचिरोली :- इंडिआ आघाडी मधुन चिमुर – गडचिरोली लोकसभा निर्वाचन क्षेत्रासाठी कांग्रेसचे डॉ.नामदेव किरसान यांना उमेदवारी मिळाल्यामुळे ते इंडिआ आघाडीतील सर्व पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्याच्या उपस्थितीत दिनांक- २७ मार्च ला  नामांकन अर्ज जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या कार्यालयात दाखल करणार असल्याचे कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी माहीती दिली.डॉ. नामदेवरात किरसान हे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात अधिकारी या पदावर कार्यरत होते.त्यांनी नोकरीचा राजीनाम देऊन कांग्रेस मधे प्रवेश केला होता.ते गोंदिया जिल्हा अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती.गेल्या १० वर्षापासून ते चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात कार्यरत असुन त्यांनी कांग्रेसचा मोर्चा, निदर्शने, मेळावा यात सक्रिय सहभाग दर्शविला आहे. चिमुर, डोंगरगड ते सिरोंचा पर्यत सतत नाटक – दंडारीच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग दाखवत लोकांची मने जिंकली व चिमुर क्षेत्रात लोकप्रिय झालेत.त्यांच्या कार्याची दखल घेत कांग्रेसने त्यांना चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्राची उमेदवारी देऊन विरोधकाला तगडी फाइट देणार असल्याचे बोलल्या जात आहे. दि. २७ मार्च ला त्यांची रॅली अभिनय लॉन मधुन जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या कार्यालयात नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!