Wednesday, July 29, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तऐकावे ते नवलच..! घरात राहून कंटाळा वाटतेय म्हणून मुलाने चक्क आईचा...

ऐकावे ते नवलच..! घरात राहून कंटाळा वाटतेय म्हणून मुलाने चक्क आईचा गळाच दाबला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एखादेवेळी घरात राहून वा गावात फिरून-फिरून ‘तोच बोवा येतो अन् तोच बोवा जातो’, असे होत असल्याने आता काय करावे?म्हणून जीव कंटाळवाणे झाल्यासारखे वाटते.त्यामुळे अनेकांच्या मनात वेगवेगळे विचार येत असतात.अश्याच प्रकारे नाशिक शहराच्या जेल रोडवरील शिवाजीनगर परिसरात एका ५८ वर्षीय व्यक्तीला घरी राहून कंटाळा आला. कंटाळा आल्याने त्याला काही सुचेनासे झाले.आता काय करावे म्हणून त्याने चक्क आपल्या ८० वर्षीय वृद्ध आईचा गळा दाबून हत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवारच्या रात्री घडली.पठ्ठा एवढ्यावरच थांबला नाही तर स्वतःच पोलीस ठाण्यात गेला अन् पोलिसांना सांगू लागला की,मला कंटाळा म्हणजे बोर मारत होते म्हणून मी माझ्या आईचा गळा दाबला आणि त्यात ती मरण पावली,असे म्हणताच पोलीसही चक्रावून गेले आणि त्याच्याकडे टक लावून बघतच राहिले. त्यानुसार पोलिसांनी त्याला तिथेच ताब्यात घेतले व त्याच्या घरी पोहचून घराची झाडाझडती घेतली असता खरोखरच त्याच्या वृद्ध आईचा मृतदेह आढळून आला. प्रकरणी नाशिक रोड पोलिस स्टेशनमध्ये अरविंद मुरलीधर पाटील वय ५८ वर्षे याचेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.तर  ८० वर्षीय वृद्ध त्याची आई यशोदाबाई मुरलीधर पाटील हीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हा कारागृहात कैद्यांची आरोग्य तपासणी व लसीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जागतिक हेपाटायटिस दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली यांच्या राष्ट्रीय विषाणूजन्य यकृतदाह नियंत्रण कार्यक्रम(NVHCP) अंतर्गत जिल्हा खुले कारागृह,गडचिरोली येथे आरोग्य जनजागृती, वैद्यकीय तपासणी...

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!