- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील निकालाबाबत उपस्थित केलेल्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने या पक्षाला चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. यानंतर काँग्रेसने ईव्हीएमच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेतला आहे.निकालामध्ये अनियमितता आणि सातत्याचा अभाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.निवडणूक आयोगाच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतमोजणी पारदर्शीपणे पार पडल्याचा दावा केला आहे.काँग्रेसच्या आक्षेपांचे आणि शंकांचे निरसन करण्यासाठी आयोगाने या पक्षाला चर्चेसाठी बोलावले आहे.या पक्षाच्या शिष्टमंडळासोबत उद्या,मंगळवार ३ डिसेंबर रोजी चर्चा करण्यात येणार आहे.कायदेशीर बाबींची तपासणी करून काँग्रेसला लेखी उत्तर दिले जाणार असल्याचेही आयोगाने नमूद केले. मतमोजणीवेळी सायंकाळी पाच आणि अखेरच्या टक्केवारीत गडबड झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.यावर निवडणूक आयोगाने ही धोरणात्मक प्रक्रिया असल्याचे स्पष्ट केले आहे. मतमोजणीवेळी मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्याचेही आयोगाने नमूद केले आहे.
- Advertisement -