Tuesday, August 18, 2026
Homeगडचिरोलीआदिवासी जिल्ह्यात साहित्यिकांची मांदियाळी; महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील ३४५ साहित्यिकांचा सहभाग.. 'याची...

आदिवासी जिल्ह्यात साहित्यिकांची मांदियाळी; महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील ३४५ साहित्यिकांचा सहभाग.. ‘याची देही,याची डोळा,पाहिला महामृत्युंजय सोहळा’.. -जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.मोहन खडसे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोलीच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात ‘महामृत्युंजय वांड्.मय पुरस्कार वितरण सोहळा’ पार पडला.या सोहळ्यात अध्यक्षीय स्थानावरून बोलतांना अकोला येथील सुप्रसिध्द साहित्यिक व पत्रकार प्रा.डॉ.मोहन खडसे यांनी ‘याची देही,याची डोळा, पाहिला महामृत्युंजय सोहळा’ असे उदगार काढले.तर ‘गडचिरोली सारख्या आदिम जिल्ह्यात साहित्य पंढरी अवतरली असून साहित्याचे वारकरी गोळा झाले’ असे प्रतिपादन पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख अतिथी यतीन सामंत यांनी केले.
नाट्यश्रीच्या वतीने मराठी साहित्यिकांसाठी नुकतीच ‘महामृत्युंजय वाड्.मय स्पर्धा’ घेण्यात आली.या स्पर्धेत महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील एकूण ३४५ साहित्यिक यांनी सहभाग नोंदविला होता.परिक्षणाअंती ३६ साहित्यिकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येऊन त्यांना गडचिरोली येथे झालेल्या विशेष व सोहळ्यात रोख रक्कम,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,ग्रंथभेट,शाल व श्रीफळ  देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून बंगलोर (कर्नाटक) येथील सुप्रसिध्द साहित्यिक यतीन सामंत, प्रा.डॉ.मोहन खडसे (अकोला),दै.सकाळचे पत्रकार मिलींद उमरे,प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम,सिंदेवाही नाट्यश्रीचे उपाध्यक्ष दादा चुधरी व नाटककार चुडाराम बल्हारपुरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आदिवासी जिल्ह्यात साहित्यिकांची मांदियाळी👇
गडचिरोली सारख्या आदिवासी जिल्ह्यात प्रथमच मोठमोठ्या साहित्यिकांनी एकाच कार्यक्रमात उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ होती.त्यात प्रसिद्ध साहित्यिक आवर्जून उपस्थित होते.यामध्ये बंगलोर (कर्नाटक) येथून यतीन सामंत,अकोला वरुन प्रा.डॉ.मोहन खडसे,सोलापूर वरुन प्राचार्य शिवाजी शिंदे,परभणी वरुन एम.डी.इंगोले,नांदेड वरुन अशोक कुबडे,छत्रपती संभाजीनगर वरुन डॉ.ललित अधाने, वर्धा वरुन सचिन सावरकर,यवतमाळ येथून अनंता सूर,नागपूर वरुन सौ.वर्षा किडे- कुलकर्णी,बळवंत भोयर,विशाखा कांबळे,चंद्रपूर वरुन श्याम मोहरकर, राजेंद्र मुसणे,याशिवाय मुंबई,पुणे,कोल्हापूर येथील प्रसिद्ध साहित्यिकांनी कार्यक्रमास हजेरी लावली.
गौरव पुरस्कार सोहळा दिनाचे औचित्य साधून झाडीपट्टीतील २९ कलावंत व कवींचा देखील याप्रसंगी सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.नाट्यश्रीचे संगीतकार विठ्ठल खानोरकर,प्रसिद्ध नाट्य कलावंत दिवाकर बारसागडे, विजया पोगडे व तबलावादक केवळ बगमारे यांनी नांदी म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली व स्वागतगीत सादर करुन उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे संचलन योगेश गोहणे,प्रास्ताविक दिलीप मेश्राम यांनी केले तर आभार दादाजी चुधरी यांनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी प्रा.अरुण बुरे,योगेश गोहणे,रमेश निखारे,राजेंद्र जरुरकर,दिलीप मेश्राम, जितेंद्र उपाध्ये,वसंत चापले,संतोष गडपायले,निरंजन भरडकर,मारोती लाकडे,गजानन गेडाम,हेमंत कावळे, टिकाराम सालोटकर,चुडाराम बल्हारपुरे यांनी सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिस यंत्रणा सतर्क.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपुरातील नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दिसून येताच शिक्षण...

जिल्हाधिकारी व एसपी रात्रीच पोहचले मार्कंडा देवस्थान परिसरात; विकास व संवर्धन कामांची केली पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान परिसरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग(एएसआय) यांच्यामार्फत सुरू असलेल्या कामांची जिल्हाधिकारी...

सट्टा-पट्टीचे आकडे घेणारा ताब्यात..!

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरीत्या सट्टा-पट्टीचे आकडे घेणाऱ्यास ताब्यात घेत त्याच्याकडून २ हजार १५० रुपयांची रोख,सट्टा-पट्टीचे आकडे लिहिलेली चिठ्ठी,बॉलपेन व रायटिंग...

आता गडचिरोलीत होणार विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्थानिक मच्छीमार, मत्स्यकास्तकार,आदिवासी बांधव आणि बेरोजगार युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने गडचिरोली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!