Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील किचकट प्रणाली येणार संपुष्टात.. -अवघ्या आठ तासांत पूर्ण...

आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील किचकट प्रणाली येणार संपुष्टात.. -अवघ्या आठ तासांत पूर्ण होणार अर्ज मंजुरीची प्रक्रिया..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षासाठी आता ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे.नवीन प्रणालीमुळे वैद्यकीय मदतीसाठी अर्ज मंजुरीची प्रक्रिया अवघ्या आठ तासांत पूर्ण होणार असून,लवकरच रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.नव्या व्यवस्थेनुसार रुग्णाला स्वतंत्रपणे अर्ज करण्याची गरज राहणार नाही.संबंधित रुग्णालयच रुग्णाची कागदपत्रे तपासून अर्ज थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे पाठवणार आहे.त्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे. तसेच,रुग्णालयात आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर पुढील सर्व प्रक्रिया प्रशासनाच्या माध्यमातून पार पडणार असल्याने रुग्ण आणि नातेवाईकांची धावपळ कमी होईल.या नवीन ऑनलाईन प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया वेगवान होणार असून सर्व कागदपत्रे पूर्ण आणि नियमांनुसार असल्यास केवळ आठ तासांत मंजुरी दिली जाणार आहे.त्यामुळे गंभीर रुग्णांना तातडीने आर्थिक मदत मिळून उपचारांना गती मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.गेल्या आर्थिक वर्षात राज्यातील ४० हजार ७७६ रुग्णांना एकूण ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली असून या आकडेवारीवरून या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ होत असल्याचे स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर ही प्रणाली संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी नागरिकांना १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!