Sunday, October 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही ‘जुनं ते सोनं’ अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात एकेकाळी मातीच्या तेलाचा (रॉकेल/केरोसीन)दिवा तयार करून अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करीत अनेक विद्यार्थी घडलेत. झगमगत्या दुनियेत तो क्षण आजही स्मरणात असून त्याची जोड आता अनेक कुटुंबियांच्या नजरेस पडणार आहे.अश्यातच आता रॉकेल वितरणाबाबत प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.प्रत्येक लाभार्थी कुटुंबास प्रति शिधापत्रिका तीन लिटर रॉकेल मिळणार असून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना प्राधान्य देण्यात येणार आहे.त्यासह,उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिकाधारक, शिधापत्रिका नसलेले कुटुंब (ग्रामपंचायत दाखल्यासह)तसेच स्थलांतरित मजूर यांनाही वितरण केले जाईल.तालुकास्तरावर तहसीलदारांच्या देखरेखीखाली वितरण होणार असून, गैरवापर टाळण्यासाठी संयुक्त तपासणी पथक (तहसीलदार,पुरवठा अधिकारी, पोलिस)नियुक्त करण्यात येणार आहे.केरोसीनचा वापर फक्त घरगुती कारणासाठीच करता येणार असून,भेसळ किंवा अनधिकृत विक्री आढळल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम,१९५५ अंतर्गत कारवाई करण्यात येईल. संबंधितांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.त्यातच, रॉकेलचा संपूर्ण कोटा वाटप दिनांकापासून ४५ दिवसांत उचलणे बंधनकारक असून उर्वरित साठा पुढे नेण्यात येणार नाही.वितरण प्रक्रिया तेल कंपन्यांचे वितरक, किरकोळ परवानाधारक/रास्तभाव दुकानदार,लाभार्थी अशा टप्प्यांत राबविण्यात येणार आहे.प्रत्येक लाभार्थ्यास तीन लीटरप्रमाणे वाटप करणे आवश्यक असून,दर जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेले राहतील.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!