उद्रेक न्युज वृत्त :-देशभरातील एलपीजी वितरक(गॅस एजन्सीधारक)कमिशनवाढ व इतर विविध मागण्यांसाठी आज,सोमवार २६ ऑक्टोंबर रोजी देशाची राजधानी दिल्ली येथे आंदोलन करणार आहेत.एलपीजी डिस्ट्रीब्यूटर्स असोसिएशनने मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.मात्र, एलपीजी वितरकांच्या दुसऱ्या संघटनेने म्हणजेच फेडरेशन ऑफ एलपीजी डिस्ट्रीब्यूटर्स ऑफ इंडिया (एफएलडीआय)ने या आंदोलनापासून आणि संपापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच गॅस सिलिंडरचा पुरवठा आणि वितरण सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.अश्यातच आंदोलनाची घोषणा करणाऱ्या एलपीजी डिस्ट्रीब्यूटर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.एस.शर्मा यांच्या म्हणण्यानुसार,वितरकांच्या कमिशनमध्ये २०१८ नंतर २०२२ मध्ये काही प्रमाणात वाढ करण्यात आली होती.मात्र,कमिशन,प्रशासकीय खर्च आणि घरपोच सिलिंडर पोहोचवण्याच्या शुल्कात बदल करण्याचा प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहे.त्यामुळे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. फेडरेशन ऑफ एलपीजी डिस्ट्रीब्यूटर्स ऑफ इंडियाने प्रस्तावित आंदोलन आणि बेमुदत संपाला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले.संघटनेच्या म्हणण्यानुसार,पेट्रोलियम मंत्रालय आणि सरकारी तेल कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. वितरकांच्या समस्यांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्याचा दावाही संघटनेने केला.मात्र, मंत्रालयाकडून या आश्वासनाला स्वतंत्रपणे दुजोरा मिळालेला नाही.
आज गॅस एजन्सी धारकांचा संप..!
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

