- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.हा संपूर्ण महिना व्रतवैकल्य,धार्मिक विधी, भगवान शंकराची भक्ती,पूजा आणि उपवासासाठी समर्पित आहे.अश्यातच श्रावण महिना केव्हापासून सुरू होणार अशी उत्सुकता आता संपली आहे.आज,गुरुवार १३ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत असून हा महिना ११ सप्टेंबरपर्यंत असेल.यावेळी सोमवार १७ ऑगस्ट,२४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर असे श्रावणातील चार सोमवार असतील.
धार्मिक मान्यतेनुसार व हिंदू धर्मानुसार श्रावण महिना अत्यंत शुभ मानला जातो,परंतु या महिन्यातील सोमवार विशेषतः भगवान शिवाला समर्पित आहे. भाविकांची अशी धारणा आहे की,या दिवशी उपवास केल्याने आणि शिवलिंगाला जल अर्पण केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात.म्हणूनच श्रावण महिन्यातील सोमवाराला विशेष धार्मिक महत्त्व आहे आणि मोठ्या संख्येने भक्त या दिवशी उपवास करतात.स्कंदपुराणातील सेतु-माहात्म्यमध्ये श्रीरामचंद्रांच्या शिवपूजनाचा उल्लेख आहे.यात देवी सीतेने वाळूचे शिवलिंग बनवले होते.श्रीरामचंद्रांनी ते स्थापित करून शिव-पार्वतीची पूजा केली आणि जलाभिषेक केला होता.त्याच पद्धतीने घर आणि मंदिरांमध्ये शिवपूजन करता येते.पंचांगानुसार या वर्षी श्रावण आज गुरुवार १३ ऑगस्टपासून सुरू होऊन शुक्रवार ११ सप्टेंबरपर्यंत राहील.अशा प्रकारे श्रावण महिना एकूण ३० दिवसांचा असेल.या दरम्यान १७,२४, ३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर रोजी चार श्रावण सोमवार असतील.१८,२५ ऑगस्ट १ आणि ८ सप्टेंबर रोजी मंगळा गौरी व्रत असतील.याशिवाय नागपंचमी,पुत्रदा एकादशी आणि रक्षाबंधन देखील याच महिन्यात येतील.
- Advertisement -

