उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- हल्ली सोशल मीडियाचा वापर सर्वात जास्त वाढलेला दिसून येतो.अशातच अल्पवयीन मुलींचा सोशल मीडियावरील वापर अधिक घातक ठरत आहे.मागील काही वर्षांत घडलेल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सर्वाधिक घटना मित्र,सोशल मीडियाद्वारे झालेली ओळख यातून घडल्याचे दिसून येत आहे.१५ ते १७ वयोगटातील मुलींसोबत मैत्री वाढवून अनेक अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत.त्यावरून कुमार वयातील पायरी चढतांनाच त्यांचा तोल घसरत असल्याचे दिसून येत आहे. मात्र,त्यामध्ये बहुतांश घटना या परिचित व्यक्ती,नातेवाईक यांच्याकडूनच घडलेल्या दिसून येतात.विवाहित महिलांसह अल्पवयीन मुली बळी पडलेल्या आहेत.
कित्येक महिला अत्याचाराच्या बळी पडतांना निदर्शनास येऊ लागले आहे.त्यामध्ये बलात्कार, अपहरण,विनयभंग,कौटुंबिक अत्याचार,हत्या अशा घटनांचा समावेश आहे.सर्वाधिक घटना सोशल मीडियामुळे झालेल्या ओळखतीतून,जवळचे मित्र यांच्याकडून घडलेल्या आहेत.कुमार वयात येत असलेल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, परिस्थितीचा फायदा घेऊन चांगली स्वप्ने दाखवून पळवून नेले जात आहे.
यानंतर त्यांचे लैंगिक शोषण करून सोडून दिले जाते. अथवा पोलिसांकडून त्यांचा शोध घेऊन पुन्हा कुटुंबांच्या ताब्यात दिले जाते.अशा घटनांमध्ये पॉक्सोचा गुन्हा दाखल होताच पोलिसांकडून अटकदेखील केली जाते.सदर प्रकरणावरून अनोळखी व्यक्ती वा इतर यांच्याशी नाहक वा विनाकारण गोष्टी टाळून सोशल मीडियाचा योग्य वापर करणे गरजेचे आहे.