उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम, आदिवासी,बहुल व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.कुठल्याही प्रकारची सुरुवात केली जात असेल तर सर्वात अगोदर गडचिरोली जिल्ह्याला टार्गेट केले जाते.कारण की,’गडचिरोली जिल्हा व पैश्याच्या खादोळीवर भिल्ला’ असे उगेच म्हटले जात नाही. असाच प्रकार सुरजागड लोह खाणीचे प्रकरणात दिसून येत असल्याने कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)पश्चिम सब झोनल ब्यूरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने दोन पाणी पत्रक काढून अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांना धमकीचे पत्रक जारी केले असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
सुरजागड लोह खाण विरोधात अनेक जण आवाज उठवीत आहेत.मात्र सुरू असलेल्या खाणी विरोधात आवाज उठवीत असतांनाही सत्ताधारी व हल्ली बनलेले मंत्री महोदय सरकारच्या बाजूने असल्याने याची किंमत चुकवावी लागणार असल्याचे धमकीचे पत्रक नक्षल्यांनी दिले आहे.आदिवासींचे जंगल आणि जमीन उध्वस्त केल्या प्रकरणीही किंमत चुकवावी लागेल;असाही इशारा पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.