Wednesday, September 23, 2026
Homeझारखंडअजब प्रेमाची; गजब कहाणी...! लग्नास नकार दिल्याने प्रियकराच्या घरासमोर 'तिचे' ८० तास...

अजब प्रेमाची; गजब कहाणी…! लग्नास नकार दिल्याने प्रियकराच्या घरासमोर ‘तिचे’ ८० तास उपोषण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

झारखंड :-.धनबादमध्ये ‘अजब प्रेम की गजब कहानी’ पाहायला मिळाली आहे. गेल्या ८० तासांपासून प्रेयसी आपल्या प्रियकराच्या घराबाहेर ठाण मांडून बसली होती.अखेरीस प्रियकर लग्नासाठी तयार झाला आणि दोघांच्याही कुटुंबीयांनी पुढाकार घेत धूमधडाक्यात लग्न लावून दिले. धनबादच्या महेशपूर परिसरातील ही घटना आहे. महेशपूरचे पंचायतचे प्रमुख मनोज महतो यांनी पुढाकार घेत वर पक्षाचे कुटुंबीय आणि वधूचे कुटुंबीय गंगापूर स्थित लिलौरी माताच्या मंदिरात पोहोचले. मंदिराचे पुजारी उदय तिवारी यांनी वैदीक पद्धतीत लग्न लावून दिले. यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रेमिका निशा आणि महेशपूरचा रहिवासी असलेला उत्तम महतो यांचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. पण लग्नाच्या २० दिवस आधी उत्तम याने लग्नास नकार दिला. त्यानंतर निशा कुटुंबीयांसह थेट उत्तमच्या घरी पोहोचली आणि दरवाजाबाहेरच उपोषणाला बसली. यानंतर उत्तम आणि त्याचे कुटुंबीय फरार झाले होते.अखेरीस निशाच्या वडिलांनी राजगंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर दोन्ही पक्षांची अनेकदा बैठक झाली व लग्नास तयार झाले. लग्नानंतर निशाने आपले प्रेम आपल्याला मिळाल्याचा आनंद असल्याचे म्हटले. तसेच पोलिसात दाखल केलेली तक्रारदेखील मागे घेतली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!