Saturday, September 26, 2026
Homeअमरावतीसावधान..! ..या ठीकाणी सापडल्या ५०० रुपयांच्या नकली नोटा 

सावधान..! ..या ठीकाणी सापडल्या ५०० रुपयांच्या नकली नोटा 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 अमरावती :- शहरांमध्येही बनावट नोटा चलनात आणणारी टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. सराफा बाजारात व्यापाऱ्यांनी बँक ऑफ बडोदा येथे जमा केलेल्या ५०० रुपयांच्या २० नोटा बनावट असल्याचे आढळून आले आहे.याप्रकरणी बँकेचे शाखा व्यवस्थापक शशिकांत प्रेमचंद वारके यांच्या फिर्यादीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.खोलापुरीगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराफा बाजारात बँक ऑफ बडोदाची शाखा आहे.१६ एप्रिल रोजी बँकेत काही ज्वेलर्सच्या चालू खात्यात २५ हजार ५०० रुपये जमा करण्यात आले.ज्यामध्ये ५०० रुपयांच्या तीन नोटा बनावट असल्याचे आढळून आले.त्यानंतर कांतम ज्वेलर्सच्या चालू खात्यात जमा केलेल्या २५ लाखांच्या रक्कमेपैकी ५०० रुपयांच्या १४ नोटा बनावट असल्याचे आढळून आले.तसेच सराफा बाजार येथील रावसाहेब यमगार यांच्या बचत खात्यात ५ हजार रुपये जमा करण्यात आले होते.त्यात तीन नोटा बनावट आढळून आले.अशाप्रकारे बँकेत एकूण २० बनावट नोटा बँकेत जमा करण्यात आल्याचे आढळून आले.याप्रकरणात बँकेचे शाखा व्यवस्थापक शशिकांत प्रेमचंद वारके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४८९ (ब) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

पोलीस दलात खळबळ; बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह..!

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या...

बस आणि कारची समोरासमोर धडक; बीसीएन न्यूजचे संपादक गंभीर जखमी.. -नागपूरला हलवले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.झालेल्या अपघातात कारमधील बीसीएन न्यूजचे संपादक...

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.. -पहा संपूर्ण तालुक्यांची यादी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-यंदाच्या एलनिनोच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!