Tuesday, August 25, 2026
Homeगडचिरोलीराज्य बाल हक्क आयोगाने उपसरपंचा अर्चना बोरकुटे यांच्या निवेदनाची घेतली दखल…-मुख्य कार्यकारी...

राज्य बाल हक्क आयोगाने उपसरपंचा अर्चना बोरकुटे यांच्या निवेदनाची घेतली दखल…-मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-गडचिरोली तालुक्याच्या साखरा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातव्या वर्गाचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.साखरा हे गाव राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी विभागला गेला असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जातांना आणि येतांना मुख्य मार्ग ओलांडून यावे लागते. गडचिरोली ते नागपूर राज्य महामार्ग -सी ३५३’ ला अगदी २० मिटर अंतरावर शाळा असल्याने सदर मार्गावरून वाहने ही भरधाव वेगाने जात असतात.भरधाव वेगाने चालणाऱ्या वाहनांमुळे विध्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून शाळेत जावे लागत आहे.त्यामुळे एखादेवेळी मार्गावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे बोरकुटे यांनी शाळेसमोर गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती.त्यानुसार सदर प्रकरणाचे अनुषंगाने २०१९ मध्ये गडचिरोली येथील जिल्हा प्रशासन गडचरोली तसेच राष्ट्रीय बाल हक्क आयोग दिल्ली यांनी घेतलेल्या जन सुनावणी मध्ये जिल्हा परिषद शाळेसमोर गतिरोधक तयार करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते.आयोगाने संबंधित विभागाचे विभाग प्रमुख यांना सदर प्रकरणात तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.परंतु आजतागायत संबंधित विभागाने अजून पर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही.

साखरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचा अर्चना बोरकुटे यांनी गतीरोधक बसविण्यासाठी अध्यक्ष राज्य बाल हक्क आयोग मुंबई यांना निवेदन सादर केले होते. त्यानुसार राज्य बाल हक्क आयोगाने दखल घेत गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी,विभागीय परिवहन अधिकारी तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना सत दिवसाचे आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि 'रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' अर्थात 'रॉ'...

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!