Friday, May 1, 2026
Homeगडचिरोलीरब्‍बी हंगाम २०२४; तालुका,जिल्‍हा व राज्‍य पातळीवर पिकस्पर्धेचे आयोजन... - पिकस्पर्धेत सहभागी...

रब्‍बी हंगाम २०२४; तालुका,जिल्‍हा व राज्‍य पातळीवर पिकस्पर्धेचे आयोजन… – पिकस्पर्धेत सहभागी व्हा व मिळवा बक्षिसे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते.अशा  प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्‍ती,मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल.तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल,हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत  पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.शासन निर्णय क्र.पीकस्‍पर्धा -२०२०/प्र.क्र.११३/४अे,दि.२० जुलै २०२३ अन्‍वये रब्‍बी हंगाम २०२४ मध्‍येही पिकस्‍पर्धा मागील वर्षाप्रमाणे तालुका,जिल्‍हा व राज्‍य पातळीवर राबविण्‍यात येत आहेत.त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी,गहू, हरभरा,करडई व जवस या ५ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
पीकस्पर्धेतील पीके👇
रब्बी पीके- ज्वारी,गहू,हरभरा,करडई व जवस (एकूण ५ पिके)
पात्रता निकष👇
स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे.स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल.पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या  स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान  ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे👇
विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)
ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन
७/१२,८-अ चा उतारा
जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास)
पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख👇
रब्‍बी हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहिल.
ज्वारी,गहू,हरभरा,करडई व जवस- ३१ डिसेंबर
तालुकास्तर,जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल- प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क👇
पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम ३०० रुपये  तर आदिवासी गटासाठी १५० रुपये
बक्षिस स्वरुप👇
सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रुपये
१)तालुका पातळी-पहिले बक्षीस ५ हजार रुपये, दुसरे बक्षीस ३ हजार रुपये तर तिसरे बक्षीस २ हजार रुपये.
२)जिल्हा पातळी-पहिले बक्षीस १० हजार रुपये, दुसरे बक्षीस ७ हजार रुपये तर तिसरे बक्षीस ५ हजार रुपये.
३)राज्य पातळी-पहिले बक्षीस ५० हजार रुपये,दुसरे बक्षीस ४० हजार रुपये तर तिसरे बक्षीस ३० हजार रुपये.
उपरोक्‍त नमुद पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्‍हावी याकरीता जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी पिकस्‍पर्धेत सहभागी व्‍हावे; असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्‍यात येत आहे.पिकस्‍पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शेतकरी बंधुभगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच महाराष्ट्र शासन कृषी  विभागाचे संकेतस्‍थळ www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!