- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जीवन जगत असतांना केवळ आपल्याच धुंदीत न राहता,ज्याप्रमाणे समाजाशी आपले काही घेणे असते त्याहीपेक्षा समाजाला देणे असते.त्यातच जीवनाचे सार्थक होईल,अन्यथा जसा आला तसाच निघून गेला.त्याला कुणीही विचारत नाही.पोर्ला येथील श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक व महाराष्ट्र भाट समाज विदर्भ उपाध्यक्ष, केशवराव दशमुखे व सिंधुबाई दशमुखे दाम्पत्य वस्त्रदान,अन्नदान आदी विविध उपक्रम घेऊन समाजाचे ऋण फेडत आहेत.अशातच राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी ‘श्री गुरुदेव ज्येष्ठ सेवाभावी दाम्पत्य पुरस्कार’ दिला जातो.त्यातच दशमुखे दाम्पत्यांचे कार्य बघता यंदाचा पुरस्कार
गडचिरोली तालुक्यातील पोर्ला येथील श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक व महाराष्ट्र भाट समाज विदर्भ उपाध्यक्ष,केशवराव दशमुखे व सिंधुबाई दशमुखे यांना काल शुक्रवारी २१ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला.येत्या ६ व ७ मार्च रोजी सांगडी मंडल-बेला (जि.आदिलाबाद)येथे होणाऱ्या १९ व्या आंतरराज्य राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
- Advertisement -

