Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीपंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन- १५ ते १७ मार्च पर्यंत...

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन- १५ ते १७ मार्च पर्यंत कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोलीच्या वतीने १५ ते १७ मार्च २०२३ रोजी पंडीत दिनदयाल ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घेणेकरिता ईच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर गेल्यावर त्यानंतर जॉब सिकर हा पर्याय निवडुन आपला नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक व पासवर्ड ने लॉगीन करून करावे. लॉगीन केल्यानंतर आपल्या प्रोफाईल होम पेजवरील पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअर गडचिरोली हा पर्याय निवडावा.गडचिरोली जिल्हयाची निवड करून फिल्टर बटनावर क्लिक करा.रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअर या ओळीतील ॲक्शन मेन्युतील दुस-या बटनावर (व्हॅकन्सी लिस्टिंग) क्लिक करून आय ॲग्री हा पर्याय निवडावा.त्यानंतर आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार मॅचिंग झालेल्या आस्थापना,कंपन्यांच्या रिक्त पदांना अप्लाय करावे. अशा प्रकारे रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा; असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली या कार्यालयाने केले आहे.अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पोलीस मुख्यालया समोर शासकीय संकुल बॅरेक क्र.२, गडचिरोली कार्यालयास संपर्क साधावा.असे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!