Saturday, June 27, 2026
Homeगडचिरोलीतलावातील गाळ उपसा करायचंय तर करा ऑनलाइन अर्ज -जलरथाला जिल्हाधिकाऱ्यांच्या...

तलावातील गाळ उपसा करायचंय तर करा ऑनलाइन अर्ज -जलरथाला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवी झेंडी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ आणि ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या महत्वाकांक्षी योजनेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जलरथाला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते आज,शुक्रवार २५ एप्रिलला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.यावेळी जलसंधारण अधिकारी अमित राऊत,व्ही.बी.सयाम, उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील,भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष महेंद्र मंडलेचा,डॉ.गणेश जैन,निरज बोथरा तसेच जिल्ह्यातील विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामपातळीवर तलाव पुनरुज्जीवनाच्या उद्देशाने शासनाने ही योजना राबवली असून तलावातील गाळ काढण्याचा संपूर्ण खर्च शासन करणार आहे.यासाठी राज्यभर एकसंध दर निश्चित करण्यात आला आहे. ग्रामपंचायती किंवा पात्र स्वयंसेवी संस्थांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अर्ज करून काम हाती घेता येईल.
विशेष म्हणजे,तलावातील गाळ शेतात नेण्यासाठी अल्पभूधारक,अत्यल्पभूधारक,विधवा,अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून निश्चित दराने अनुदान दिले जाणार आहे.
योजनेचा प्रचार-प्रसार,शेतकऱ्यांना प्रोत्साहन, जनजागृती व मागणी अर्ज निर्मितीसाठी भारतीय जैन संघटना (बीजेएस) आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.त्याच अनुषंगाने तयार करण्यात आलेला जलरथ जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन योजना पोहचवणार आहे.योजनेत सहभागी होण्यासाठी गावाचे सरपंच ‘बीजेएस डिमांड ॲप’ वरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. गडचिरोली जिल्ह्यासाठी नेमलेले प्रशिक्षित जिल्हा समन्वयक राजन बोरकर आणि बीजेएसचे कार्यकर्ते हे ग्रामपंचायती,शेतकरी व प्रशासन यांना मार्गदर्शन व सहकार्य करणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात केले स्वागत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "मोठी स्वप्ने पाहा,शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा," असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली...

डीआरआयची मोठी कारवाई; वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात बेकायदेशीर वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...

घरून निघाला ‘तो’ परतलाच नाही; ५९ वर्षीय इसम दहा दिवसांपासून बेपत्ता..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या श्रीनगर वार्डातील केस कटिंगचा (न्हावी)व्यवसाय करणारा ५९ वर्षीय इसम घरून दुकानात जाण्यासाठी निघाला तो अद्यापही घरी परतला नसल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!