Saturday, September 26, 2026
Homeगडचिरोलीघरी शौचालय असूनही उघड्यावर शौचास जाण्याला पसंती…

घरी शौचालय असूनही उघड्यावर शौचास जाण्याला पसंती…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- शासनातर्फे शहरी तसेच ग्रामीण भागात ‘स्वच्छ भारत मिशन’ राबवून जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी गावे हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.त्यासाठी प्रत्येक कुटुंबाला घरोघरी शौचालय संकल्पना राबवून काहींना शौचालय बांधून देण्यात आले.तर काहींनी स्वतः बांधकाम करून योजनेचा लाभ घेतला आहे.मात्र,आजही घरात शौचालय असताना गावखेड्यांत महिला,पुरुष हे उघड्यावर शौचास जाताना दिसतात.तर शौचालयात काड्या,गोवरी इत्यादी साहित्य ठेवलेले आढळून येते. परिणामी ग्रामीण भागात हागणदारीमुक्तीचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.

गतकाळात शासनाने हागणदारीमुक्तीचा नारा देत सर्वत्र जनजागृती केली.जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे, या दृष्टीने ही संकल्पना महत्त्वाची असल्याचे पटवून देण्यात आले.शासनाने कोणीही उघड्यावर शौचास जाऊ नये; यासाठी प्रत्येक कुटुंबाला शौचालयासाठी अनुदान उपलब्ध करून दिले.तसेच ग्रामीण भागात पंचायत समिती व ग्रामपंचायतींतर्गत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.गुड मॉर्निंग पथके नेमण्यात आली.या पथकांद्वारे रोज फेरफटका मारून जनतेमध्ये जनजागृती करीत आवश्यक सूचना केल्या.

त्यासाठी हागणदारीमुक्त गावांना पुरस्कृतही करण्यात आले.पण हे अभियान काही दिवसांपुरतेच मर्यादित राहिल्याचे दिसून येते.त्यामुळे सदर बाबीची दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

पोलीस दलात खळबळ; बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह..!

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या...

बस आणि कारची समोरासमोर धडक; बीसीएन न्यूजचे संपादक गंभीर जखमी.. -नागपूरला हलवले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.झालेल्या अपघातात कारमधील बीसीएन न्यूजचे संपादक...

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.. -पहा संपूर्ण तालुक्यांची यादी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-यंदाच्या एलनिनोच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!