Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात प्रथमच विवाहपुर्व एचआयव्ही व सिकेलसेल तपासणी

गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच विवाहपुर्व एचआयव्ही व सिकेलसेल तपासणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- एचआयव्ही(एड्स) विषयी आपल्या समाजात अजुनही अनेक समज,गैरसमज व भय आहे.त्यामुळे तपासणी करीता लोक घाबरतात, परंतु आपल्या गडचिरोलीमध्ये सामुहिक विवाहासाठी आलेल्या वर वधुनी यावर मात केली आहे. व आपल्या आरोग्याच्या व कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी विवाहपुर्व एचआयव्ही तपासणी व सिकेलसेल आजाराची तपासणी करुन घेतली आणि गडचिरोली जिल्ह्याकरीता नविन विक्रम केला.
२५ मार्च २०२३ रोजी शनिवारी मैत्री परिवार संस्था, नागपूर व पोलीस दल गडचिरोली यांच्यामार्फत आयोजित सामुहिक विवाह सोहळयात लग्नबंधनासाठी आलेल्या जोडप्याची जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील एचआयव्ही विभाग व सिकेलसेल विभागातर्फे १२७ जोडप्याची विवाहपुर्व तपासणी करण्यात आली. यात तीन जोडप्याची सिकेलसेल चाचणी सकारात्मक आली.
याकरीता जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली डॉ.अनिल रुडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महेश भांडेकर, सिकेलसेल समन्वय, रचना फुलझेले,समुपदेशक सविता वैद्य, प्रयोगशाळा तंत्रज्ञ निलिमा बालपांडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ धिरज इंगळे, समुपदेशक निता बालपांडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ स्वप्नील चापले, समुपदेशक श्रीकांत मोडक तसेच संपुर्ण कार्यक्रमाकरीता डॉ.अमित साळवे यांनी मोलाचे सहकार्य केले.विवाहपूर्व एचआयव्ही व सिकेलसेल तपासणी एकदा जरूर करून घ्यावे;असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सामान्य रुग्णालय गडचिरोली यांनी कळविले आहे.


Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!