उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-नुकतेच डॉ.बाबा साहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मंगळवार पेठ पुणे येथे सिने आर्क प्रोडक्शन व रुद्रांश फाऊंडेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर विनोद खैरे नागपूर-मुंबई याच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात अभूतपूर्व उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महाराष्ट्रातील १०१ जणांची ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४’ साठी निवड करण्यात आली. यामध्ये गडचिरोलीच्या नवेगाव कॉम्प्लेक्स येथील निवासी किरण महादेवराव चौधरी ह्या ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४’ च्या मानकरी ठरल्या आहेत.
महाराष्ट्र राज्यातून विविध क्षेत्रातील नामवंत सामाजिक संस्था,कला क्षेत्र,क्रिडा क्षेत्र, सांस्कृतिक, गायन क्षेत्र,वादन,नृत्य, लेखक,कवी, कवयत्री,नामवंत किर्तनकार,तसेच पत्रकारीता इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीमत्वांना ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.सदर पुरस्कारासाठी राज्यातून प्रस्ताव मागविण्यात आले होते.त्यानुसार निवड समितीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १०१ जणांची ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४’ साठी निवड करण्यात आली.
गडचिरोलीच्या किरण चौधरी ह्या ‘देश बचाव पुरुष बचाव’ च्या चंद्रपूर संघटनेत कार्यरत आहेत.या संस्थेतर्फे २०२२ मध्ये त्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.खैरे कुणबी रणरागिणी मंचतर्फे रणरागिणी समाजभूषण पुरस्कार मिळाले आहे.महिलांनी संघटित व सक्षम व्हावे; याकरीता विविध कार्यक्रम आयोजित करीत असतात.
देशन्नती मनस्विनी तर्फे उत्कृष्ट कवियित्री पुरस्कार तसेच स्वयंसिद्ध ज्ञानसिंधू,सिंधू महिला विश्व संभाजीनगर येथे पुरस्कार प्राप्त करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातून पहिल्या महिला मानकरी आहेत.अनेक ऑनलाईन कवीसंमेलन तसेच आयोजिका राहिल्या आहेत.झाडीबोली साहित्य मंडळ महिला दिनी त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.अनेक सत्कार त्यांच्या नावे आहेत.त्यांचे ‘त्रिवेणीचा संगम’ हे पाहिले पुस्तक प्रकाशित झालेले आहे.सामजिक कार्यात सक्रिय असून कोरोना योद्धा म्हणून रणरागिणी मंचतर्फे पुरस्कार मिळाला आहे.आतापर्यंत केलेल्या भरीव कार्याची दखल घेत त्यांना ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४ देऊन गौरविण्यात आले आहे.

