Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोली१०० रुपयांचा स्टॅम्प पेपर ११० रुपयांना…५ रुपयांची तिकीट १० रुपये तर १०...

१०० रुपयांचा स्टॅम्प पेपर ११० रुपयांना…५ रुपयांची तिकीट १० रुपये तर १० रुपयांची तिकीट १५ रुपये..-यावर आळा घालणार कोण?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- पूर्वी तसेच आजच्या आधुनिक युगात स्टॅम्प पेपरचे महत्व आजही कायम आहे.महत्वाचे म्हणजे शासकीय धोरणामुळे भाडे करार असो वा प्रतिज्ञापत्र,नवीन योजना,वारसाचे प्रमाण,ॲफेडेव्हिट, टेंडर,बँक कर्ज यासह विविध योजना मिळविण्यासाठी १०० रुपयांचे स्टॅम्प पेपर बंधनकारक आहे.हा स्टॅम्प मिळविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक व्हेंडरकडे

 जातात.मात्र, प्रत्येक व्हेंडरकडे याचे दर वेगवेगळे आहेत.१०० रुपयांचे स्टॅम्प पेपर कुणी ११० तर कुणी १२० रुपये घेऊन सर्वसामान्य जनतेला चुना लावण्याचे काम करीत आहेत.गडचिरोली तहसील कार्यालय असो वा जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालय वा ज्याठिकाणी स्टॅम्प मिळतो; अशा ठिकाणी निर्धारित दरापेक्षा १० रुपये अतिरिक्त दर स्टॅम्पवर आकारण्यात येत आहे.हे अतिरिक्त दर दिल्याशिवाय स्टॅम्प दिल्या जात नाही.पूर्वी खरेदी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात स्टॅम्प लागत होते.आता ऑनलाइन पद्धत सुरू होऊनही अनेक कारणांसाठी स्टॅम्प खरेदी करण्यात येतात.मात्र १०० रुपयांच्या स्टॅम्प सोबतच ५ रुपयांची तिकीट १० रुपये तर १० रुपयांची तिकीट १५ रुपये आकारून आपलीच पोळी शेकण्याचा अनेकजण प्रयत्न करीत आहेत.अशातच नाईलाजास्तव सर्वसामान्य नागरिक तात्कळत वा हुज्जतबाजी घालण्यापेक्षा ‘चलती का नाम गाडी’ करून आपले काम होत आहे न..मग उगाच कशाला भानगडीत पडावे? असा विचार करुन अनेकजण हात झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत.मात्र सदर प्रकार चुकीचा आहे.त्यामुळेच अनेकांवर फटाके फुटले जातात.वाचा असूनही वाचा नसल्या सारखे करणे म्हणजे याला काय म्हणावे?मेहनत करेगा मुर्गा अन् अंडा खाये फकीर…. वारे ही लाकिर…! यावर आळा शासन घालुच शकत नाही? जो पर्यंत वाचा फुटणार नाही; तोपर्यंत अशीच अवस्था असणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!