उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- यंदाच्या हिवाळी अधिवेशनात २ हेक्टरपर्यंत धानाला प्रतिहेक्टरी २० हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे.मात्र मार्गदर्शक सूचना अद्यापही आलेली नाही; परंतु मागील वर्षीच्या धोरणानुसार बोनसचा लाभ मिळण्यासाठी शासनाच्या एनईएमएल पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी सदर पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे.हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी मिळण्यासाठी तसेच बोनसचा लाभ शासकीय धान खरेदी केंद्रांवर शासनाच्या एनईएमएल पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे.यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.नोंदणीसाठी केवळ चार दिवसच शिल्लक आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनो,नोंदणी झाली का? याची खात्री करून घ्या.शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये; यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन शासनाची एजन्सी म्हणून शासकीय धान खरेदी केंद्रांवरून धान खरेदी करते.यंदा शासनाने धानाला २१८३ रुपये हमीभाव जाहीर केला आहे.शासकीय धान खरेदी केंद्रांवर हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी शासनाच्या एनईएमएल पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे.नोंदणी न करणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रांवर धानाची विक्री करता येत नाही. शिवाय त्यांना शासनाने जाहीर केलेल्या बोनसचासुद्धा लाभ घेता येणार नाही.शासनाने नोंदणी करण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत दिली आहे.

