Saturday, October 24, 2026
Homeगडचिरोलीलाच घेतांना अडकले एसीबी च्या जाळ्यात.....- अहेरी येथील प्रभारी गटविकास अधिकाऱ्यासह तीन...

लाच घेतांना अडकले एसीबी च्या जाळ्यात…..- अहेरी येथील प्रभारी गटविकास अधिकाऱ्यासह तीन जणांवर गुन्हे दाखल…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-  
तेंदूपानांची वाहतूक करण्याकरिता नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एका तेंदू कंत्राटदाराकडून १ लाख ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहेरी येथील प्रभारी गटविकास अधिकाऱ्यासह तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. प्रतीक दिवाकर चन्नावार,संजीव येल्ला कोठारी व अनिल बुधाजी गोवर्धन अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.यातील प्रतीक चन्नावार हे प्रभारी गटविकास अधिकारी असून,संजीव कोठारी हा कंत्राटी पेसा समन्वयक तर अनिल गोवर्धन हा खासगी व्यक्ती आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारकर्त्या कंत्राटदाराने गोविंदगाव येथील तेंदूपानांचे युनिट लिलावाद्वारे खरेदी केले होते.या तेंदूपानांची वाहतूक करण्याकरिता पंचायत समितीकडून नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती.हे प्रमाणपत्र देण्यासाठी गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार व तालुका पेसा समन्वयक संजीव कोठारी यांनी कंत्राटदारास १ लाख ३० हजार रुपयांची लाच मागितली.परंतु लाच देण्याची मूळीच इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल २५ ऑगस्ट २०२३ रोजी सापळा रचला असता अनिल गोवर्धन याच्या माध्यमातून तक्रारकर्त्याकडून १ लाख ३० हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारताना रंगेहाथ पकडले.याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रभारी गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार फरार आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!