- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार भवन नसल्याने पत्रकारांना बैठका,पत्रकार परिषदा,प्रशिक्षण कार्यक्रम,दस्तऐवजांचे जतन तसेच विविध संघटनात्मक कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.ही समस्या दूर करण्यासाठी स्वतंत्र पत्रकार भवन उभारणे गरजेचे असल्याने आज, बुधवार १४ ऑक्टोंबर रोजी अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटना गडचिरोली व देसाईगंज यांच्या वतीने पत्रकार भवनासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्याची मागणी देसाईगंज तहसीलदारांकडे करण्यात आली.देसाईगंज तहसीलदार यांच्या ३ जून २०२६ रोजीच्या पत्रानुसार,मौजा नैनपूर येथील भूमापन क्रमांक-१७७ व सर्वे क्रमांक-१७८ संदर्भातील शासकीय नजूल जमिनीबाबत चौकशी सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.सदर चौकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधित जागा शासकीय असल्याचे निष्पन्न झाल्यास किंवा त्यातील शासकीय जागा उपलब्ध असल्यास,ती पत्रकार भवनासाठी आरक्षित करून देण्यात यावी,अशी मागणी संघटनेने केली आहे.
महत्वाचे म्हणजे,पत्रकार भवन उभारल्यास देसाईगंज तालुक्यासह जिल्ह्यातील पत्रकारांना बैठका,पत्रकार परिषदा,प्रशिक्षण शिबिरे आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होऊ शकते.तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि लोकहिताच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणे शक्य होईल.नैनपूर येथील उपलब्ध शासकीय जागेची पाहणी करून तिची मालकी व उपलब्धता निश्चित करावी आणि शासनाच्या नियमांनुसार पत्रकार भवनासाठी जागा विनामूल्य अथवा नाममात्र भाडेपट्ट्याने मंजूर करावी,अशी मागणी संघटनेने केली आहे.या मागणीवर तहसील प्रशासन कोणती भूमिका घेते,याकडे पत्रकार संघटना व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
निवेदन सादर करतेवेळी अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटनेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष बाबू कुरेशी,जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद मेश्राम,जिल्हा सचिव तबरेज खान,देसाईगंज तालुकाध्यक्ष सत्यवान रामटेके,उपाध्यक्ष फिरोज लालानी,तालुका सचिव जिब्राईल शेख,सुरेश मुटकुतवार,अरुण धुर्वे,तेजझ वाढपाल्लीवर,संदीप भिवंकर,शंकर मूत्यवार,जाफर शेख आदी पत्रकार तथा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
- Advertisement -

