- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने दिलेली मुदत येत्या,३० जून २०२६ रोजी संपत असून १ जुलै २०२६ पासून एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी सर्व शासकीय तसेच खासगी वाहनधारकांना मुदतीपूर्वी एचएसआरपी प्लेट बसवून घेण्याचे आवाहन केले आहे.मात्र,ज्यांनी एचएसआरपी बसविण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतलेली असेल,त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.वाहनधारकांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता तात्काळ नोंदणी करून उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवून घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -

