Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीमॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन..

मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री यंग अचीव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम(PM YASASVI) योजनेअंतर्गत राज्यातील विजाभज (विमुक्त जाती व भटक्या जमाती),इमाव(इतर मागास वर्ग)व विमाप्र (विशेष मागास प्रवर्ग)या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व(इयत्ता ९ वी व १० वी)तसेच मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे.इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासन निर्णय दिनांक-२० जून २०२५ नुसार ही योजना अंमलात असून,पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल(NSP)वर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे.या योजनेअंतर्गत अर्ज नोंदणीची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे.तसेच संबंधित शाळा व महाविद्यालयांनी संस्था स्तरावर पडताळणी करण्यासाठीची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२६ आहे.त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करावेत व संबंधित प्राचार्य व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळणीची कार्यवाही विहित कालावधीत पूर्ण करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
पीएम यशस्वी योजनेंतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक पात्रता,प्रवर्ग प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र,आधार क्रमांक,बँक खाते तपशील आदी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरावा. अर्ज प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये,यासाठी शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे, असेही नमूद करण्यात आले आहे.अर्ज नोंदणी अथवा पडताळणी प्रक्रियेसंदर्भात कोणतीही अडचण असल्यास संबंधितांनी इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधावा,असे आवाहन डॉ.सचिन मडावी सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय गडचिरोली यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!