Friday, August 7, 2026
Homeगडचिरोलीविहिरीचे खोदकाम करतांना अंगावर मातीचा ढिगारा कोसळला.. - दोन मजुरांचा मृत्यू तर...

विहिरीचे खोदकाम करतांना अंगावर मातीचा ढिगारा कोसळला.. – दोन मजुरांचा मृत्यू तर एक जण थोडक्यात बचावला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली येथे शेतातील विहिरीचे खोदकाम करतांना अचानकपणे तीन मजुरांच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाला तर एक मजूर थोडक्यात बचावला असल्याची घटना आज,मंगळवार ८ एप्रिल रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली.कोंडा समय्या वय ३६ वर्षे रा.
जानमपल्ली,ता.सिरोंचा व उप्पूला रवी वय ३१ वर्षे रा.जानमपल्ली,ता.सिरोंचा अशी मातीच्या
ढिगाऱ्याखाली दबून मृत्यु झालेल्या मजुरांची नावे आहेत.तर संतोष कोनम वय ३२ वर्षे रा.जानमपल्ली हा थोडक्यात बचावला आहे.
माहितीनुसार,सिरोंचा तालुक्याच्या जानमपल्ली येथील शेतकरी धन्नाडा समक्का या शेतकऱ्याच्या शेतात विहीर बांधकामाचे काम सुरू असून आज,मंगळवारी सकाळच्या सुमारास विहिरीच्या आतमध्ये तीन मजुरांद्वारे खोदकाम सुरू होते.सदर विहिरीचे खोदकाम हे जवळपास ५० फूट खोलपर्यंत जाऊन  पाण्यासाठी आणखी खोदकाम करीत असतांना अचानकपणे खालच्या स्तरातील माती व वरच्या स्तरावरील माती तिन्ही मजुरांवर कोसळली.त्यामुळे कोंडा समय्या व उप्पूला रवी मातीच्या ढिगाऱ्याखाली बराच काळ दबल्या गेले.अशातच तिसरा मजूर संतोष कोनम हा अर्धवट दबल्या गेल्याने माती ओढण्यासाठी विहिरीच्या नजीक असलेल्या मजुरांनी त्याला दोरखंडाणे ओढून बाहेर काढले.लागलीच सदरची घटना ग्रामस्थांच्या लक्षात येताच पोलीस प्रशासन, स्थानिक पदाधिकारी यांनी बचाव कार्य सुरू केले.मात्र,बराच वेळ मातीच्या ढिगाऱ्याखाली राहिल्याने दोन्ही मजुरांचा मृत्यू झाला.सदर घटनेचा पुढील तपास सिरोंचा पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!