- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज गुलमोहर कॉलनी गांधी वार्ड निवासी,साप्ताहिक गडचिरोली माझा वृत्तपत्राचे संपादक तथा पत्रकार इलियास खान यांचे लहान बंधू डॉ.शहजाद खान मोहम्मद खान पठाण यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे अमरावती या ठिकाणी आयोजित ४१ व्या दीक्षांत समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नुकतेच आचार्य पदवी(पीएचडी) बहाल करीत सन्मानित करण्यात आले.
डॉ.शहजाद खान मोहम्मद खान पठाण यांनी वर्ष
२०१०-२०११ ते २०१९-२०२० या कालावधित गडचिरोली जिल्ह्याच्या आर्थिक विकासात सूरजागड लोह प्रकल्पाचे योगदान एक चिकित्सक अध्ययन केले होते.त्यानुसार वाणिज्य(Commerce)या विषयात शहजादखान मोहम्मद खान पठाण यांना आचार्य (Ph.D)पदवी बहाल करण्यात आली.अमरावती विद्यापीठात पार पडलेल्या दीक्षांत समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, सर्वोच्य न्यायालयाचे न्यायाधिश भूषण गवई, विद्यापीठाचे कुलगुरू तथा इतर मान्यवर उपस्थित होते.
- Advertisement -

