Saturday, October 17, 2026
Homeइंदौरलाइक्स,शेअर मिळवण्याच्या नादात तरुणांनी चक्क बाईकवरच पेटवली शेकोटी

लाइक्स,शेअर मिळवण्याच्या नादात तरुणांनी चक्क बाईकवरच पेटवली शेकोटी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

इंदौर : हल्ली सोशल मीडियाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.लाइक्स,शेअर मिळवण्याच्या नादात कोण,केव्हा काय करेल सांगताच येत नाही.आजची तरुणाई जीव धोक्यात घालून जगावेगळे करू पाहत आहे.अशाच प्रकारे इंदौर मधील दोन तरुणांनी चक्क चालत्या बाईकवरच शेकोटी पेटवत व्हिडिओ बनवला आणि पोस्ट केला.

 त्यांच्या व्हिडीओला अपेक्षित लाईक्स मिळाल्या; पण पोलिसांकडून असले प्रकार पुन्हा न करण्याची  सक्त ताकीदही मिळाली.दोन तरुण रात्री बाईकवरून जात असताना मागे बसलेला तरुण चालकाच्या पाठीला पाठ लावून बसला.दोन पायांच्या मध्ये पेटलेली शेकोटी ठेवलेली असून तो शेकत होता.बाईकच्या वेगामुळे वारा उलट्या दिशेने वाहत असल्याने तरुणाला शेकोटीच्या ज्वालांचा धोका जाणवत नाही.मात्र इतर वाहन चालकांना शेकोटीचा धोका निर्माण होतो.पोलिसांना सदर प्रकार निदर्शनास आल्यावर त्यांनी असा विचित्र प्रकार का करताय, असे विचारल्यावर सोशल मीडियासाठी व्हिडिओ बनवत असल्याचे तरुणांनी सांगितले.त्यानंतर पोलसांनी सदर तरुणांना ताकीद दिली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!