गडचिरोली:-सेप्टिक टाक्यांची स्वच्छता केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून ५४ हजार रुपये स्वीकारणाऱ्या व उर्वरित ९६ हजारांची फोनवरून मागणी करणाऱ्या पोलिस अधीक्षक(एस पी) कार्यालयातील वरिष्ठ श्रेणी लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मंगळवारी १२ नोव्हेंबरच्या रात्री ताब्यात घेतले.विकी भास्कर प्रधान वय ३० वर्षे,असे त्या लिपिकाचे नाव आहे.तक्रारदार हा स्वच्छता कंत्राटदार असून,त्याने पोलिस ठाणे,मुख्यालय आदी ठिकाणच्या सेप्टिक टाक्यांच्या स्वच्छतेचे काम घेतले होते.याचे बिल काढून दिल्याच्या मोबदल्यात इमारत शाखेचा लिपिक विकी प्रधान याने दीड लाख रुपयांची लाच मागितली होती.आधी दोन टप्प्यांत ५४ हजार रुपये स्वीकारले व उर्वरित रकमेपैकी दहा हजार रुपये आणून दे,अशी मागणी फोन करून केली.शिवाय,राहिलेल्या पैशांची नंतर व्यवस्था करून दे,अशी मागणी केली. यासंदर्भात २४ ऑक्टोंबरला कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.त्यानंतर त्याच दिवशी एसीबी पथकाने पडताळणी केली असता, पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ८ नोव्हेंबरला सापळा रचला.पण संशय आल्याने विकीने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. अखेर लाच मागितल्याच्या आरोपाखाली एसीबीच्या पथकाने मंगळवारी प्रधान याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गडचिरोली ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.ही कारवाई उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.संतोष पाटील,सहाय्यक उपनिरीक्षक सुनील पेद्दीवार,हवालदार शंकर डांगे, अंमलदार सप्नील बांबुर्डे,संदीप घोनमोडे,संदीप उडाण,राजेश पद्मगीरवार, ज्योत्स्ना वसाके,विद्या मशाखेत्री, राजेश्वर कुमरे यांनी केली.
सेप्टिक टाक्यांची स्वच्छता केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल लाचेची मागणी.. – एस पी कार्यालयातील वरिष्ठ श्रेणी लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या ताब्यात…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

