Saturday, October 24, 2026
Homeगडचिरोलीशेतकरी भावा; बोनस हवा.!-उरले केवळ चार दिवस…पटकन नोंदणी करून घ्यावी…

शेतकरी भावा; बोनस हवा.!-उरले केवळ चार दिवस…पटकन नोंदणी करून घ्यावी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- यंदाच्या हिवाळी अधिवेशनात २ हेक्टरपर्यंत धानाला प्रतिहेक्टरी २० हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे.मात्र मार्गदर्शक सूचना अद्यापही आलेली नाही; परंतु मागील वर्षीच्या धोरणानुसार बोनसचा लाभ मिळण्यासाठी शासनाच्या एनईएमएल पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी सदर पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे.हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी मिळण्यासाठी तसेच बोनसचा लाभ शासकीय धान खरेदी केंद्रांवर शासनाच्या एनईएमएल पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे.यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.नोंदणीसाठी केवळ चार दिवसच शिल्लक आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनो,नोंदणी झाली का? याची खात्री करून घ्या.शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये;  यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन शासनाची एजन्सी म्हणून शासकीय धान खरेदी केंद्रांवरून धान खरेदी करते.यंदा शासनाने धानाला २१८३ रुपये हमीभाव जाहीर केला आहे.शासकीय धान खरेदी केंद्रांवर हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी शासनाच्या एनईएमएल पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे.नोंदणी न करणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रांवर धानाची विक्री करता येत नाही. शिवाय त्यांना शासनाने जाहीर केलेल्या बोनसचासुद्धा लाभ घेता येणार नाही.शासनाने नोंदणी करण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत दिली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!