Wednesday, August 12, 2026
Homeगडचिरोलीशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवीन सेवार्थ प्रणाली लागू.. - ‘डेटा मायग्रेशन’ व...

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवीन सेवार्थ प्रणाली लागू.. – ‘डेटा मायग्रेशन’ व पायलट वेतन देयक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन.. – सुट्टीच्या दिवशीही कोषागार व उपकोषागार कार्यालये राहणार सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाची प्रक्रिया अधिक वेगवान,सुलभ आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या १ जुलै २०२६ च्या शासन निर्णयानुसार नवीन सेवार्थ प्रणाली लागू करण्यात आली आहे.या प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी (DDO),कार्यालय प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी जुन्या सेवार्थ प्रणालीतील माहितीचे ‘डेटा मायग्रेशन’ तसेच नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये जुलै २०२६ महिन्याचे प्रायोगिक वेतन देयक(Pilot Bill) तयार करण्याची प्रक्रिया २० ऑगस्ट २०२६ पूर्वी अनिवार्यपणे पूर्ण करावी,असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम यांनी केले आहे.
नवीन सेवार्थ प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी जुन्या सेवार्थ प्रणालीमध्ये नोंद असलेल्या सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती आणि सेवा तपशील नवीन पोर्टलवर स्थलांतरित करण्याची(Data Migration)प्रक्रिया सध्या कोषागार कार्यालय स्तरावर युद्धपातळीवर सुरू आहे.त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती व सेवा तपशील अचूकपणे नवीन प्रणालीमध्ये स्थलांतरित करण्याची कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करणे आवश्यक आहे.
२० ऑगस्टनंतर जुन्या प्रणालीत नवीन कामकाज नाही👇
संचालनालय,लेखा व कोषागारे,मुंबई यांच्या निर्देशानुसार जुन्या सेवार्थ प्रणालीमध्ये २० ऑगस्ट २०२६ नंतर कोणतेही नवीन कामकाज अथवा बिल निर्मिती करता येणार नाही.त्यामुळे संबंधित कार्यालयांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता डेटा मायग्रेशनची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.
त्याचबरोबर नवीन सेवार्थ प्रणाली व्यवस्थित कार्यरत असल्याची खात्री करण्यासाठी जुलै २०२६ महिन्याचे वेतन देयक प्रायोगिक स्वरूपात(Pilot Bill Generate)तयार करण्याची प्रक्रिया देखील २० ऑगस्टपूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे.या प्रक्रियेमुळे नवीन प्रणालीमध्ये वेतन देयक तयार करतांना येणाऱ्या तांत्रिक किंवा माहितीविषयक त्रुटी वेळेत निदर्शनास आणून त्यांचे निराकरण करणे शक्य होणार आहे.
मुदतवाढ मिळणार नाही👇
डेटा मायग्रेशन आणि पायलट देयक तयार करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या कालावधीतच सर्व प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असून,या कामासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही,असे संचालनालय, लेखा व कोषागारे, मुंबई यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व आहरण व संवितरण अधिकारी, कार्यालय प्रमुख तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी या बाबीची गांभीर्याने नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करावी.
सुट्टीच्या दिवशीही कोषागार कार्यालये राहणार सुरू👇
नवीन सेवार्थ प्रणालीतील डेटा मायग्रेशन व पायलट वेतन देयकाची प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण करता यावी आणि संबंधित कार्यालयांना आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्यातील सर्व कोषागार व उपकोषागार कार्यालये सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत.
सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी नवीन सेवार्थ प्रणालीतील डेटा मायग्रेशन आणि पायलट देयक तयार करण्याचे काम २० ऑगस्ट २०२६ पूर्वी पूर्ण करून कोषागार प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’ला कायदेशीर संरक्षण प्राप्त.. -कोणत्याही शासकीय कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ प्रथम गायले जाईल..

उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मंगळवारी 'राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण (सुधारणा)विधेयक २०२६' ला मंजुरी दिल्याने आता राष्ट्रीय गीत असलेल्या 'वंदे मातरम्'ला...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत पिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला.. – कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्याने सांगितला आनंददायक अनुभव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)योजनेअंतर्गत मी ३० पाईपची मागणी केली होती.पाईप खरेदी केल्यानंतर अवघ्या ८ दिवसांच्या आत माझ्या खात्यात ८०...

कारची ट्रकला मागून जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज,बुधवार १२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला; तर...

सर्पदंश दुर्घटनेनंतर प्रशासनाची कठोर कारवाई; मुख्याध्यापक व दोन वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल.. – आश्रमशाळा बंद करण्याची शासनाकडे शिफारस..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची जिल्हा प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाने गंभीर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!